लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करताना मतदानयंत्राऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. असे केल्यानेच लोकांच्या मनातील संशय दूर होईल, असेही ते म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

अमेरिकेसारख्या देशाने मतदान यंत्राने (ईव्हीएम) निवडणूक घेणे बंद केले आहे. भारतातही ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे केंद्र सकार सांगत आहे तर तर एकदा मतपत्रिकेवर निवडणूक घेऊनच पाहावी.

आणखी वाचा-‘ते’ अशांतता पसरवू शकतात…तो प्रयत्न हाणून पाडा- मनोज जरांगे पाटील

भाजप विरोधी पक्षात असताना त्यांचे नेतेही ईव्हीएमवर निवडणुका घेणे बंद करण्याची भूमिका मांडत होते. भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाना पटोले हे पोटनिवडणूक ६७ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अडीच लाख मतांनी निवडून आला. सहा महिन्यात इतके मतपरिवर्तन कसे घडून येते, असा प्रश्न उपस्थित करीत यामुळे जनतेच्या मनात संशय असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar demanded that the election be held through ballot papers instead of voting machines rbt 74 mrj