चंद्रपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्याविरोधात माजी मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा गांधी हे केवळ भारताचे सन्मान नसून संपूर्ण जगाचे सन्मान आहेत. संपूर्ण जगात महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमत्त्वाचा अभ्यास केला जातो. त्यांनी जगाला शांती, अहींसा, प्रेम याचा संदेश दिला, म्हणूनच २००७ पासून संयुक्त राष्ट्रसंघाने २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे. महात्मा गांधी यांच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव अनेक महान विभुतींवर होता. महान वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन यांनी महात्मा गांधी हा केवळ हाडामासाचा माणूस नसून जीवंत विचार आहे, असे सांगितले होते. अशा महान विभूतीबद्दल संभाजी भिडे यांनी काढलेले उद्गार असंतोष निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने भारतीयांच्या मनात भिडेंविरोधात निषेधाची भावना आहे. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे, जातीय दंगली घडाव्यात यासाठी तरुणांना प्रेरित करणे, असे कृत्य ते नेहमीच करीत आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी तक्रारीद्वारे केली आहे.

हेही वाचा – नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांचे भाजपमध्ये महत्त्व अबाधित

हेही वाचा – पावसाची विश्रांती! आता काही दिवस सूर्यनारायण डोकावणार

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, न. प. आरोग्य सभापती अ‍ॅड. बाला शुक्ला, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सोनू नाकतोडे, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके यांसह अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar police complaint against sambhaji bhide congress aggressive in chandrapur too rsj 74 ssb
Show comments