नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमधून निलंबित माजी आमदार आशीष देशमुख यांची त्यांच्या निवासस्थानी शनिवारी भेट घेतली. या भेटीवरून राजकीय चर्चा जोरात सुरू असून, देशमुख पुन्हा भाजपाच्या वाट्यावर असल्याचे बोलले जात आहे. याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – चंद्रपूरवासीयांची सावलीने साथ सोडली; सूर्य डोक्यावर मात्र सावली गायब…

विजय वडेट्टीवार म्हणाले, त्यांच्यात नव्याने मैत्री होत असावी, असे मला वाटते. कारण शुक्रवारी सावनेर विधानसभा मतदारसंघात भाजपाची सभा झाली. हा मतदारसंघ काँग्रेस नेते सुनील केदार यांचा आहे. ही सभा या मतदारसंघातील उमेदवार आणि स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी फडणवीस यांनी घेतली होती. याचा अर्थ त्या ठिकाणी भाजपाचे पर्याय शोधण्याचे काम सुरू दिसते. परंतु, पर्याय त्यांच्याकडे नाही. त्यामुळे बाहेरून आणून पर्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न आसावा, असेही वडेट्टीवार म्हणाले.