नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत शरद पवार यांनी एका व्यासपीठावर येण्याचे टाळायला हवे होते. ही जनभावना आहे. परंतु तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. ती काही महाविकास आघाडीची भूमिका नाही. त्यामुळे आघाडीवर त्याचा काही परिणाम होईल असे अजिबात समजू नये, असे मत काँग्रेसचे विधानसभेतील नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात बोलताना व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ज्यांनी नागपूर वसवले, त्यांच्याच वंशजांची जागेसाठी वणवण; गोंड राजे बख्त बुलंद शहांचे वंशज सरकारवर नाराज, कारण काय, वाचा…

हेही वाचा – गोंदिया भाजी बाजारात टोमॅटो २०० रुपये किलो, सर्वसामान्यांचे हाल

पवार यांची भूमिका वादग्रस्त वाटत असली तरी त्यामुळे वेगळे वातावरण निर्माण होईल असा अंदाज बांधणे चुकीचे आहे. मोदी यांच्या कार्यक्रमात पवार यांच्या उपस्थितीचा चुकीचा अर्थ लावण्याची गरज नाही. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे त्यांनी फार पूर्वीच मान्य केले होते. महाविकास आघाडी मजबूत आहे. सर्व निवडणूकपूर्व सर्वेक्षण महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत, असेही ते म्हणाले.