नागपूर: अवकाळी पावसाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात मांडली.

अवकाळी पाऊस, शेतकरी नुकसान या मुद्दयावर विरोधी पक्षाने स्थगन प्रस्ताव मांडला होता. तो सरकारने नाकारला, परंतु आतापर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारने अखेर आज शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा… पीक विम्याचे ५२ रुपये नेण्यासाठी शेतकऱ्यांनी आणली चक्क तिजोरी; पोलिसांना म्हणाले, सुरक्षा पुरवा….!

हा दौरा फक्त फोटोसेशन पुरता मर्यादित न राहता मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी ट्वीटद्वारे केली. विरोधकांच्या घोषणाबाजीनंतर अखेर कुंभकर्ण सरकार जागे झाले, असेही वडेट्टीवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Story img Loader