विजय वडेट्टीवार यांचा काँग्रेसला घरचा अहेर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : निवडणुकीत पक्षश्रेष्ठींनी हवी तशी साथ दिली नाही. तसेच विदर्भातील काही नेत्यांच्या सांगण्यावरून चुकीच्या लोकांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे काँग्रेसला विदर्भात किमान दहा जागांवर नुकसान झाले, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला.

वडेट्टीवार म्हणाले, पक्षश्रेष्ठींना आम्ही विदर्भात ज्या ठिकाणी सभा घेण्याची विनंती केली त्या सभादेखील मिळाल्या नाहीत. त्याचा फटका विदर्भातील दहा जागांवर काँग्रेसला बसला. विदर्भातील एका मोठय़ा नेत्याने उमेदवारीवाटपात हस्तक्षेप केला. त्याचे नाव योग्य वेळी सांगेन, असे सांगून त्यांनी पक्षांतर्गत राजकारणावर बोट ठेवले. जनतेने महाआघाडीला विरोधी पक्ष म्हणून जनादेश दिला आहे. आम्ही ती भूमिका बजावू, विरोधी पक्षनेतेपद आता राष्ट्रवादीकडे असेल, असेही ते म्हणाले. नितीन गडकरी यांना डावलल्यामुळे भाजपला फटका बसला. या माणसाने पक्ष येथे मोठा केला. जर गडकरी यांच्या मतानुसार उमेदवार दिले असते, तर भाजपच्या जागा कमी झाल्या नसत्या, असेही ते म्हणाले.

सत्तेसाठी भाजप-सेनेत संघर्ष

लोकसभेपूर्वी भाजप-सेनेत चर्चा झाली आणि सूत्र ठरले, असे आज सांगण्यात येत आहे. ही चर्चा केली तेव्हा मातोश्रीवर किंवा वर्षां बंगल्याच्या चौकात खुच्र्या मांडल्या नव्हत्या. मग आता लोकांना फिफ्टी-फिफ्टीच्या गोष्टी सांगता, असा सवाल करीत सत्तेसाठी शिवसेना-भाजपचा लोकांसमोर  हे भांडण सुरु आहेअशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.