नागपूर: शासनाने काढलेल्या कंत्राटी भरती विरोधात राज्यातील युवा वर्गात प्रचंड आक्रोश आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाला राज्यात ठिकठिकाणी विरोध केला जात आहे. राज्य सरकारने कंत्राटी नोकरभरतीचा जीआर काढला आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारामध्ये संताप निर्माण झाला आहे. राज्य शासनाने कंत्राटी भरतीचा जीआर काढून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या लाखो बेरोजगार तरुणांची गळचेपी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वर्ग २, ३ व वर्ग ४ च्या १८६ संवर्गातील सर्व पदे शासन कंत्राटी पद्धतीने भरणार आहे. या निर्णयाचा तीव्र विरोध राज्यातील युवा वर्ग करत आहे. कंत्राटी भरतीचा शासन निर्णय फाडून महायुती सरकारचा निषेध राज्यातील अनेक भागात होत आहे. पुढे सुद्धा जोपर्यंत सरकार निर्णय रद्द करणार नाही तोपर्यंत या निर्णयाचा विरोध महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मोर्चा आणि आंदोलन करून करावे, असे आवाहन यावेळी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केले.

हेही वाचा… चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू तस्करी जोरात

स्पर्धा परीक्षा संघर्ष कृती समिती द्वारा वर्धा येथे आयोजित लाक्षणिक उपोषण स्थळी विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे पाठिंबा दिला. त्यानंतर एक्स (ट्विट) वडेट्टीवार त्यांनी भूमिका मांडली.