वाशिम: विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात होते. त्यांनी सकाळी १० वाजे दरम्यान थेट शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केली. जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक भागात पीक परिस्थिती चिंताजनक असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार ६ सप्टेंबर रोजी रिसोड तालुक्यातील केनवड शेत शिवारातील पिकांची पाहणी केली. यावेळी आमदार अमित झनक यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील अनेक भागात पावसाअभावी पिके कोमेजून जात असल्याने तत्काळ भरपाई मिळाली पाहिजे, यासाठी शासनदरबारी हा प्रश्न मांडणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.