विविध कंपन्याच्या जाहिरातीमधून महिलांना आज विक्षिप्त रुपात दाखविल्या जात आहे. एक प्रकारे हे हिंदू संस्कृतीवर आक्रमण आहे. स्त्रीचे जाहिरातीतून असे रूप दाखविणाऱ्यांना प्रतिसाद न देता त्यावर त्वरित प्रतिक्रिया देणे महत्वाचे आहे. यासाठी समाजात महिलांनी सकारात्मक योगदान देण्याची आज गरज असल्याचे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी व्यक्त केले.
हेही वाचा- शाळांमध्ये तांदूळ आहेत; पण इंधन, तेल नाही.. ; राज्यात शालेय पोषण आहार योजनेची दयनीय स्थिती
राष्ट्र सेविका समितीच्या विजयादशमी उत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत होत्या. रेशीमबागमधील स्मृती भवन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाप्रबंधक प्रतिक्षा तोंडवळकर आणि महानगर प्रमुख करुणा साठे उपस्थित होत्या.
शांताक्का म्हणाल्या, समाजात विकसित चेतना असलेले नागरिक घडविण्याची आज गरज असून मातृशक्ती हे काम चोखपणे पार पाडत आहे. हिंदू चिंतनानुसार स्त्री आणि पुरुष एकाच तत्त्वानुसार निर्माण झाले आहेत. ते परस्पर पूरक आहेत. दोघांमध्ये ही भावना असल्यास दोघांनाही प्रोत्साहन मिळेल. मदतीची अपेक्षा न करता आपण पुढे जायला हवे. यासाठी आपण दृढ निश्चय करायला हवा. लहानपणापासून मुलांवर चांगले संस्कार व्हायला हवे.
हेही वाचा- यवतमाळ : देशाची वाटचाल विनाशाकडे; अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा यांची टीका
अत्याचार करणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायला हवी. प्रत्येक क्षेत्रात स्त्रीला पुढे जाण्याची संधी महिलेला मिळायला हवी. यासाठी स्त्री पुरुष मिळून आज कार्य करण्याची गरज आहे. जात धर्म या भेदाबाबत विचार करण्यापेक्षा आपल्या स्वातंत्र्याबाबत आपण विचार करायला हवा. कारण, समस्त संघटित हिंदू समाजाची निर्मिती करणे गरजेचे आहे. पवित्रता, धैर्य आणि दृढता अशा गुणांचा हिंदू समाज निर्माण करण्याची गरज आहे. समितीच्या शाखेतून असे संदेश आपण पोहोचवायला हवे, असे आवाहन शांताक्का यांनी केले. समर्पण भावनेने राष्ट्रासाठी कार्य करणाऱ्यांचे सामान्य व्यक्ती ऐकत असतो. असे व्यक्तिमत्व घडविणे हे राष्ट्र सेविका समितीचे कार्य असल्याचे त्या म्हणाल्या.
हेही वाचा- नागपूर : स्मार्ट सिटीच्या कामातून ‘शापूरजी’ला वगळले; कामात दिरंगाई भोवली
प्रमुख अतिथी प्रतीक्षा तोंडवळकर यांनी सफाई कामगार म्हणून बँकेत काम करताना महाप्रबंधक पदापर्यंत पोहचण्यासाठी करावा लागणारा संघर्ष यावेळी सांगितला. सूत्रसंचालन आदिती देशमुख तर प्रास्ताविक जुई जोशी आणि डॉ. स्मिता पत्तरकीने यांनी आभार मानले.