लोकसत्ता टीम
नागपूर : अंबाझरी तलावाच्या विसर्ग पॉईंट म्हणजेच ‘ओव्हर फ्लो’ पॉईंटसमोर स्वामी विवेकानंद यांचा पुतळा उभारण्यात आला. त्यासाठी बांधण्यात आलेल्या चबुतऱ्यामुळे पाणी अडते. त्यामुळे अंबाझरी तलावाची भिंत कमकुवत होत आहे. शुक्रवारी आलेला पूर हा मानवनिर्मित आहे. याला प्रशासन जबबादार आहे, असा आरोप आमदार विकास ठाकरे यांनी केला आहे.
आणखी वाचा-चंद्रपूर : २५ उपकेंद्रासाठी २६९ एकर जमीन महावितरणला भाडेपट्ट्यावर उपलब्ध
अंबाझरी लेआऊट, वर्मा लेआऊट, डागा लेआऊट हे नासुप्रने मंजूर केलेले लेआऊट आहेत. येथील बांधकामाचा नकाशा नासुप्रने मंजूर केला आहे. या अधिकृत वसाहती आहेत. पण, नासुप्रने ‘क्रेझी कॅसल’च्या वॉटर पार्कला परवानगी दिली. त्यानंतर नाग नदीचे ६० फूट रुंद पात्र २० फूट करण्यात आले. त्यामुळे ‘ओव्हरफ्लो’च्या पाण्याला अडथळा निर्माण झाला आणि पाणी वसाहतीमध्ये शिरले. पाण्याच्या मार्गातील अडथळा दूर करण्यात यावा, अरुंद केलेली नदी पूर्ववत करण्यात यावी तसेच गोरेवाडा तलावाचे पाणी वसाहतीमध्ये येत आहे तेथे तातडीने भिंती बांधावी, असे आमदार विकास ठाकरे म्हणाले.