वर्धा: समुद्रपुर तालुक्यातील तडगाव बीट मध्ये एका वाघाने सोमवारी शेतकऱ्याचा फडशा पाडला होता. गावालगत असलेल्या शेतात गोविंदा चौधरी हे काम करीत असताना त्यांना वाघाने दोनशे फूट फरफटत नेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दोन शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहल्याने लवकर उजेडात आली होते.
गावकऱ्यांचा रोष पाहून मृतकाच्या कुटुंबास अवघ्या काही तासात दहा लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. आता परत हा वाघ गुरगुरत आहे. बुधवारी रात्री त्याच्या डरकाळ्या ऐकल्याचे शेतकरी सांगत आहे. या पार्श्वभूमीवर कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले आहे. तसेच मोठी चमू गस्त घालत आहे.
हेही वाचा… भुसावळ – नागपूर पॅसेंजर तीन वर्षांपासून बंदच; प्रवाशांचे हाल
आज पुन्हा कॅमेरा ट्रॅप वाढविणार आहे, अशी माहिती वन परिक्षेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी दिली. हा ताडगाव परिसर घनदाट अरण्यात असल्याने वन खात्याची कसोटी लागत आहे.