औष्णिक वीज केंद्राच्या राखेमुळे गावकऱ्यांची शेती खराब झाली असताना आता गुप्ता कोल वॉशरीजमुळे गावकऱ्यांवर आणखी नवे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील येसंबा व वराडा गावातील गावकऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत त्यांना ही कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे.जिल्ह्यातील येसंबा या गावापासून ५०० किलोमीटरवर गुप्ता कोलवॉशरी महामिनरल प्रा.लि. ही कंपनी सुरू आहे. या कंपनीत कोळशावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे स्थानिकांच्या शेतातील पिकांवर त्याचा दुष्परिणाम होत असून नागरिक तसेच जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. ही कोलवॉशरी विद्यमान सरकारला पाठींबा देणाऱ्या एका राजकीय नेत्याच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. अनेक वर्षे ती बंद होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीला बंद करण्याबाबत नोटीस दिली होती. ही नोटीस मिळाल्यानंतर त्या कंपनीची वीज आणि पाणी बंद केले जाते. मात्र, या कंपनीत ते सुरूच होते. दरम्यान, कंपनी मालकाने मुंबईत मंडळाच्या मुख्यालयात संपर्क साधला आणि दहा लाखांची बँक हमी भरली. त्यानंतर मंडळाने काही अर्टी आणि शर्तीवर ही कंपनी सुरू करण्यास मान्यता दिली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे कंपनीने मान्य केले, पण आजतागायत ती मिळाली नाही.
नागपूर : गुप्ता कोलवॉशरी बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी, पिके झाली काळी, आरोग्याच्या समस्या
औष्णिक वीज केंद्राच्या राखेमुळे गावकऱ्यांची शेती खराब झाली असताना आता गुप्ता कोल वॉशरीजमुळे गावकऱ्यांवर आणखी नवे संकट ओढवले आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-10-2022 at 12:55 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villagers demand closure of gupta coalwashery amy