बुलढाणा: शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी जिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करणाऱ्या पालकविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ माटरगाव ( तालुका शेगाव) येथील गावकऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळला. यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात घोषणाही देण्यात आल्या.

माटरगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरावी व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी तीनशे विध्यार्थी व पालकांनी जिल्हा परिषद परिसरात शाळा भरविली.

हेही वाचा… गोंदियातील भात रोवणी अंतिम टप्प्यात; ८६.४७ टक्के क्षेत्रात पेरणी

मात्र त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी पोलिसात तक्रार दिली. यावरून शाळा समिती अध्यक्षासह ९ पालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी आज शनिवारी गावात कडकडीत बंद पाळला. जिल्हा परिषद प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थानी निषेध नोंदवला. यामुळे गावातील दैनंदिन व्यवहार ठप्प पडले.

Story img Loader