वर्धा, अकोला येथे रेल्वे वाहतूक पावसाने ठप्प पडली होती. त्यावेळी सींदी रेल्वे स्थानकावर शालिमार एक्स्प्रेस उभी ठेवण्यात आली होती. मात्र वाहतूक सुरळीत होण्यास विलंब लागण्याची चिन्हे दिसू लागली. प्रवाशी भुकेने व्याकूळ होवू लागले. तब्बल पाच तास प्रतीक्षेत गेले. या स्थानकावर जेवण्याची व्यवस्था नसल्याने आबालवृद्ध कासावीस होत असल्याचे येथील गावकऱ्यांच्या लक्षात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रात्रीचे बारा वाजत होते. येथील नंदा नदीच्या तीरावर असलेल्या हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन असल्याने महाप्रसाद ठेवण्यात आला होता. स्थानकावरील भुकेल्या प्रवाश्यांची स्थिती माहीत पडल्यावर देवस्थानच्या पुढाकाराने पन्नास साठ युवक पुढे आले. त्यांनी शिजलेल्या अन्नाचे गंज वाहनात भरून स्थानक गाठले. मग स्थानकातच पंगत बसली.

हेही वाचा… VIDEO: माकडाला हवे बिसलरीचे पाणी! व्हायरल व्हिडीओमुळे कुतूहल

भुकेने व्याकूळ जीव अखेर गरमागरम जेवण घेवून शांत झाले. महाप्रसादाचे जेवण मिळाल्याने धन्य झालेल्या प्रवास्यांनी बजरंग बलीचा जयजय करीत सिंदिकरांचा निरोप घेतला.