वर्धा : शिक्षणाची ओढ पण शाळेची सोय नाही म्हणून मग परगावी पायपीट करीत किंवा इतर वाहनांनी शाळेत जाण्याची इर्षा मुलं मुली ठेवून आहेत. त्यातही दुर्गम जंगली भागात शाळा नसल्याने या भागातील मुलांची ओढाताण होते. ते बसने प्रवास करीत शिक्षण घेतात, पण बस वेळेवर आली नाही तर चांगलीच आफत होते. हे अनुभव आष्टी तालुक्यातील मोई तांडा, मुबारकपुर, आबाद किन्ही या जंगलव्याप्त गावातील विद्यार्थी घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बस वेळेवर न आल्याने ते उशिरा शाळेत पोहचतात. त्यावेळी काही तासिका संपून जातात. शिक्षक खेकसतात. बोलणी ऐकावी लागतात. सरपंच सुषमा चव्हाण यांनी पत्र व्यवहार करूनही दाद मिळाली नाहीच. त्यास कंटाळून शंभरावर मुलामुलींनी शेवटी मार्गावर ठिय्या दिला. हा रस्ता रोको खळबळ निर्माण करणारा ठरला. ठाणेदार सुनील पवार यांनी तडक आंदोलन स्थळी भेट दिली. मुलांची समजूत काढली. त्यांना आश्र्वस्त केले. तेव्हाच मार्ग मोकळा झाला. शिकण्याची तळमळ पण शासन काही आपल्या दारी येत नाही म्हणून शासनास जागे करण्याचा विद्यार्थी व त्यांच्या आईवडिलांचा हा प्रयत्न चांगलाच चर्चेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Villages students protest buses on time pmd 64 ysh
Show comments