नागपूर : छायाचित्रकार विनय पुणेकर हत्याकांडातील मुख्य आरोपी हेमंत रामनरेश शुक्ला याला नागपूर पोलिसांना अटक करण्यात यश आले. गेल्या ४ महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. पुणेकर यांचा खून केल्यापासूनच तो फरार होता. आठवडाभराहून अधिक काळ कुठेच राहिला नाही. पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागेपर्यंत तो दुसऱ्या शहरात पळून जात होता. त्याद्वारे त्याने आतापर्यंत अटक टाळली.

पोलिसांनीही उसंत न घेता, सतत त्याचा पाठलाग केला. ५ राज्यांत वेगवेगळ्या शहरांमध्ये छापे टाकल्यानंतर हेमंतला अखेर पंजाबमधील लुधियाना शहरात पकडण्यात आले. स्थानिक न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्याला घेऊन नागपूरकडे रवाना झाले आहेत.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
kashmira pawar satara arrested forged as pmo appointed
साताऱ्यातील कश्मिरा पवारची ‘घोटाळा’झेप; आधी उत्तुंग कामगिरीच्या बातम्या, नंतर फसवाफसवी झाली उघड!
PM narendra modi and joe biden
Lok Sabha Election Result 2024 Updates : इंडिया आघाडीचं ठरलं; सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत, पण योग्य वेळी योग्य पाऊल उचलण्याचं सूचक विधान!
devendra fadnavis on pune porsche car accident (1)
पुणे पोर्श अपघात प्रकरण: देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितल्या पोलिसांच्या ‘या’ चुका; म्हणाले, “पहिली चूक म्हणजे…”
Manoj Jarange Warning to Devendra Fadnavis
लोकसभेच्या निकालानंतर मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना इशारा, “..तर विधानसभेला इंगा”
Hina khan diagnosed with breast cancer
Hina Khan Cancer: अभिनेत्री हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान, पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही वाचा…यवतमाळच्या धावपटूचा दक्षिण आफ्रिकेतील ‘कॉम्रेड’मध्ये झेंडा, ८६ किलोमीटर अंतर केवळ सात तास चार मिनिट…

२४ फेब्रुवारी रोजी दुपारी हेमंतने घरात घुसून विनय पुणेकर यांची गोळ्या झाडून हत्या केली. या प्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी हेमंतची मैत्रीण साक्षी मोहित ग्रोवर (३६) रा. मानकापूर हिला अटक केली होती. ती सध्या तुरुंगात आहे. सदर पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथकही तपासात गुंतले होते.

विविध राज्यात शोध, ३२५ जणांची चौकशी

पोलिसांनी रायपूर, रीवा, सतना, अयोध्या, दिल्ली, पानिपथ आणि सोनीपथ या वेगवेगळ्या शहरांमध्ये पोहोचून तपास केला. हेमंतसोबत संबंध असलेल्या प्रत्येक व्यक्तीला भेटले. पोलिसांनी सुमारे ३२५ जणांची चौकशी केली. त्यापैकी ५० जण पोलिसांना मदत करण्यास तयार होते. हेमंतवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा…अमरावती : स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका केव्‍हा? इच्‍छुक उमेदवार अस्‍वस्‍थ

सतत बदलले भ्रमणध्वनी क्रमांक

पूर्व अनुभवातून पोलिसांपासून लांब कसे राहायचे हे त्याला चांगले माहिती होते. पोलिसांपासून लपत फिरत असतानाच त्याने काही शहरांमध्ये मिठाईच्या दुकानावर किंवा काही ठिकाणी टोल बूथवर काम करून पैसे कमवले. पोलीस सतत आपला पाठलाग करत असल्याची जाणीव असल्याने तो ७ दिवसांपेक्षा जास्त काळ कुठेही थांबला नाही. सतत फोन नंबर बदलत होता किंवा त्याच्या मित्र आणि नातेवाईकांशी बोलण्यासाठी इतरांचे फोन वापरायचा.

हेही वाचा…अमरावती : पतीला सोडण्‍याचा निर्णय ठरला घातक; निद्राधीन पत्‍नीला पतीने केले ठार

आठ दिवस पथक पंजाबमध्ये

तो पंजाबमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पण तेथेही तो सापडणे कठीण होते. दरम्यान, हेमंतला पॅकेजिंगचे कामही माहित असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. पोलिसांनी लुधियानावर लक्ष केंद्रित केले. गेल्या ८ दिवसांपासून पोलिसांचे पथक लुधियानात तळ ठोकून होते. वेगवेगळ्या कारखान्यात जाऊन तपास केला. याच दरम्यान बुधवारी हेमंतला पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे,पोलीस उपनिरीक्षक अभिजीत चिखलीकर,अमोल दोंदळकर, प्रमोद क्षीरसागर यांनी केली.