अमरावती : जिल्‍ह्यात एकाच महिन्‍यात तब्‍बल २ हजार ३५० वाहनचालकांनी मोटार वाहन कायद्याचे उल्‍लंघन केल्‍याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्‍या (आरटीओ) भरारी पथकाच्‍या तपासणीदरम्‍यान आढळून आले आहे. जून महिन्यात या २३५० वाहन चालकांकडून ३७ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे.

वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण करणे, महामार्गावर दुचाकी वाहन चालवित असताना हेल्मेटचा वापर न करणे, तसेच वेग मर्यादेचे उल्लंघन करणे, असे प्रकार सर्रास आढळून येतात.

Navi Mumbai Municipal Corporation Encroachment Department takes action against illegal constructions in Nerul and Ghansoli
नेरुळ, घणसोलीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई; महापालिकेच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करून बांधकामे
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत

हेही वाचा >>> भरचौकात तरुणास भोसकले; यवतमाळची कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर

वाहनचालकांचे अनेक माध्यमातून समुपदेशन करण्यात येत असले, तरी वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगता अनेक वाहनचालक मोटार वाहन कायदा व नियमांचे  उल्लंघन करीत असल्याचे तपासणीदरम्‍यान निदर्शनास आले आहे. समुपदेशन केल्यानंतर वाहनचालक पुन्‍हा मोटार वाहन कायदा, नियमाचा भंग करत असेल तर त्यांना न्यायालयीन व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.

हेही वाचा >>> भंडारा : मध्यान्ह भोजनात चक्क खडे, अळ्या!; स्वयंपाकी म्हणते डोळ्याने कमी दिसते…

हेल्‍मेटचा वापर न केल्‍याबद्दल सर्वाधिक ६३१ प्रकरणांमध्‍ये कारवाई करण्यात आली आहे. वाहनाला परावर्तीत टेप न लावलेली ११२ वाहने आढळून आली. वाहनाच्या छतावर सामान वाहून नेणारे १ वाहन, आकारमान जास्‍त असलेली १० वाहने, शाळेत मुलांना घेऊन जाणारी ४ वाहने, हॉर्न, सायरनचे उल्लंघन करणारी ३ वाहने आढळून आली. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या १८ वाहन चालकांवर, वाहन चालविताना परवाना जवळ न बाळगणाऱ्या ४२० वाहनचालकांवर कारवाई करण्‍यात आली. परवाना मुदत संपूनही वाहन चालविताना ३० जण आढळून आले.

हेही वाचा >>> गोंदिया: तोल सांभाळा ताई! रस्ता चिखलाचा आहे…

वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र सादर न केलेली ११ वाहने, फिटनेस प्रमाणपत्राची विधी ग्राह्यता संपलेली १९३ वाहने, विमा प्रमाणपत्र सादर न केलेली ६८ वाहने, विमा  प्रमाणपत्राची संपलेली मुदत संपलेली १५३ वाहने, भार क्षमतेपेक्षा अधिक मालवाहून नेणारी १२ वाहने, पीयूसी प्रमाणपत्र सादर न केलेली ६० वाहने, पीयूसी ची विधी ग्राह्यता संपलेली १६९ वाहने, वाहनांच्या नंबर प्लेटवर क्रमांक नसलेली १२३ वाहने इतर नियमांचे उल्लंघन करणारी २९० वाहने आढळून आली. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक हितेश धावडा, दिनेश सुरडकर, गणेश वरुटे, प्रताप राऊत यांनी केली.

Story img Loader