मोदी सरकारच्या काळात काश्मीर, ईशान्येकडील  प्रदेशात हिंसाचारात सरासरी ८० टक्के घट झाली आहे. येत्या २५ वर्षांत जगामध्ये भारत हा सर्वक्षेत्रात प्रथम क्रमांकावर आणण्याचे लक्ष्य असून त्याची सुरुवात झाली आहे, असे असल्याचे प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. नागपूर येथे एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> चंद्रपूर: हुश्श! चार जणांना जखमी करणारा बिबट्या अखेर जेरबंद; चांदा आयुध निर्माणीत घातला होता धुमाकूळ

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. अमित शहा म्हणाले, गेल्या आठ वर्षात मोदी सरकारने जे काही निर्णय घेतले ते लोकांचे हित समोर ठेवून घेतले आहे. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने तीन मोठे विषय होते, त्यात काश्मीर, ईशान्य आणि डाव्या विचारसरणी असलेले दहशतवादी प्रदेश. मात्र आज काश्मीर, ईशान्येकडील आणि डाव्या विचारसरणीच्या दहशतवादी प्रदेशात मोदी सरकारच्या काळात ८० टक्के हिंसाचार कमी झाला काश्मीरमध्ये एका वर्षात एक कोटी ऐंशी लाख पर्यटक आले, ही खूप मोठी गोष्ट आहे. काश्मीरमध्ये ७० वर्षात १२ हजार कोटींची गुंतवणूक झाली पण, मोदी सरकारच्या काळात अवघ्या तीन वर्षात १२ हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. कलम ३७० हटवले तेव्हा संसदेत विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काश्मीरात रक्ताचे पाट वाहतील मात्र रक्ताचे पाट तर सोडा साधे लहान दगड देखील कुणी मारु शकत नाही अशी स्थिती काश्मीरमध्ये आहे.  शिवाय ईशान्येकडील हिंसाचारात ९० टक्के घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.