वर्धा : सावज टिपायला गेला अन् स्वतःच सावज झाल्याची बाब अरण्यात नेहमीचीच म्हटल्या जाते. पण राजाच्या रुबाबात वावरणारा बिबट कोल्ह्याची शिकार करताना डोक्यावर आपटला, त्यातच त्याचा बळी गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रोठा शिवारात बिबट व कोल्ह्याचा मृतदेह पडून असल्याचे माहीत झाल्यावर सहायक वन संरक्षक अमरजीत पवार व चमू घटनास्थळी पोहोचली. बारकाईने निरीक्षण केल्यावर बिबट्याच्या डोक्यावर मार दिसून आला. तर कोल्ह्याच्या शरीरावर जखमा आढळल्या. अंदाज घेतल्यावर झटापट झाली व त्यात नाल्याच्या खडकावर बिबट आदळला, असा निष्कर्ष काढण्यात आला.

हेही वाचा – चंद्रपूर: बाजार समितीमध्ये २१६ जागांसाठी ७६३ जणांचे नामांकन; अर्ज मागे घेण्यासाठी दिग्गजांची धावपळ

मृत बिबटचे सर्व अवयव सुरक्षित असून ही मादी पंधरा महिन्यांची असल्याचे सांगण्यात आले. मृतदेहांचा नियमानुसार पंचनामा करण्यात आला आहे.