नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हे पर्यटकांसाठी नेहमीच अदभूत, गूढ आणि तेवढेच आश्चर्यकारक राहिले आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. ताडोबातील वाघांनी एकदा का पर्यटकांना लळा लावला की ते कायमचे या व्याघ्रप्रकल्पाचे होऊन जातात. अर्थातच त्यात वन्यजीवप्रेमी पर्यटकांचा वाटादेखील तेवढाच आहे. वन्यजीवप्रेमी छायाचित्रकार विश्वास उगले यांनी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात वाघिणीच्या मातृत्वाचा रंगलेला क्षण चित्रित केला असून तो डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाने पर्यटकांना कधीच निराश केले नाही. या व्याघ्रप्रकल्पातील वाघांनी जगभरातील पर्यटकांना वेड लावले आहे. त्यामुळेच त्यांची पावले सातत्याने ताडोबाकडे वळतात. त्यात विविध क्षेत्रातील “सेलिब्रिटी” चा देखील समावेश आहे. अगदी अलीकडेच येऊन गेलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील ताडोबातील वाघांचा चाहता आहे. ताडोबातील वाघांच्या असंख्य कहाण्या आहेत. विश्वास उगले यांनी छोटी तारा आणि तिच्या बछड्याचा मातृत्वाचा क्षण कॅमेऱ्यात टिपला आहे. पावसाळा नुकताच संपलाय आणि सगळीकडे हिरवळ पसरली आहे. या हिरवळीत “छोटी तारा” अतिशय प्रेमाने तिच्या बछड्याला कुरवाळत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण अनेकांनी त्यांच्या डोळ्यात साठवला.

Maharashtrachi Hasyajatra Fame Actress
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Aishwarya Narkar and Avinash Narkar Romantic Dance On Ajay Devgan Song Sathiya
“मुंबईत दोन दिवसांचे कपडे घेऊन आले होते अन्…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अपूर्वा गोरेने ईशा पात्राच्या ऑडिशनचा सांगितला मजेशीर किस्सा
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
savlyachi janu savali fame megha dhade gift to veena jagtap
Video: ‘सावळ्याची जणू सावली’मधील वीणा जगतापला ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीने दिलं सुंदर गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “माझी मोठी समस्या…”
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

हे ही वाचा…कंत्राटदार परवेशला काळ्या यादीत टाकण्याची शिफारस, काय आहे प्रकरण ?

छोटी तारा’ नावाप्रमाणेच तारका… मग तिचे बछडेही तारकांप्रमाणे नसणार तर काय? ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची शान असणारी ही वाघीण कायम तिच्या बछड्यांसह पर्यटकांना अगदी सहज दर्शन देते. तिच्या बछड्यांबरोबरच तिच्या अदा पर्यटकांना खिळवून ठेवतात. याच ‘छोटी तारा’चा एक किस्सा अजूनही पर्यटकांच्या तोंडी आहे. म्हणजे अस्वलाबरोबर तिची होता होता राहिलेली लढाई. ‘छोटी तारा’ जिथे बसली होती, त्याच वाटेवरुन अस्वल जात होते. एका क्षणाला दोघेही समोरासमोर आले. तिने शेपटी हलवली आणि अस्वलावर हल्ला करण्याच्या तयारीत ती आली, पण.. अचानक अस्वल दोन्ही पायावर उभे राहिले. ‘छोटी तारा’ थोडी घाबरली. मग काय झाले कुणास ठाऊक! अस्वलानेही रस्ता बदलला आणि ‘छोटी तारा’देखील आपल्या वाटेने निघून गेली. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला पर्यटक मार्गदर्शक हा किस्सा सांगतो आणि मग ‘छोटी तारा’ आणि तिच्या बछड्याला पाहण्याची उत्सुकता अधिकच ताणली जाते.