चंद्रपूर :सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ४० टक्के, सोसायट्यांना २६ टक्के तर खुल्या कंत्राटदारांना ३४ टक्के कामे देण्याबाबत राज्य शासनाचे धोरण आहे. मात्र या धोरणला हरताळ फासण्याचे काम जिल्हा परिषदेत सुरू आहे. सुशिक्षित अभियंत्यांना कामे मिळू नये म्हणून कार्य स्थळी भेट बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक सुशिक्षित अभियंते कामापासून वंचित राहिले आहेत.

शिक्षित बेरोजागर अभियंते, मजूर सहकारी सोसायट्यांना प्राधान्यक्रमाने छोटीमोठी कामे उपलब्ध करून देण्याबाबत शासनाचा आदेश आहे. मात्र, स्थानिक जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षांपासून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांचा विसर पडला आहे. मर्जीतल्या कंत्राटदारांना कामे देण्यात येत असल्याची ओरड सातत्याने सुरू आहे. कामे वाटप करण्याबाबत जिल्हा परिषदेने समिती गठित केली आहे. मात्र, या समितीच्या बैठकाही नियमित होत नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळणे कठीण होत चालले आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने सातत्याने कामे मिळण्याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्याचा परिणाम म्हणून काम वाटप समितीची बैठक विधानसभा निवडणुकीच्या आधी झाली. या बैठकीत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नियमाप्रमाणे कामे देण्याचे ठरले. निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. त्यामुळे त्याआधीच बांधकाम विभागाने कामाची यादी केली. ही कामे जवळपास १० ते १२ कोटींच्या घरात होती.

Out of 2 lakh 21 thousand 259 sanctioned posts 33 thousand posts are vacant in Maharashtra Police Force
पोलीस दलात इतकी पदे रिक्त, महिला पोलिसांच्या पदांचाही …
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
accident on Gowari flyover in Sitabardi involved 12 15 vehicle collisions
धक्कादायक! नागपुरातील बर्डी उड्डाण पुलावर १५ वाहने एकमेकांवर धडकली
no need for Rahul Gandhi to take out yatra against EVMs says Prakash Ambedkar
‘‘ईव्हीएमविरोधात राहुल गांधींनी यात्रा काढण्याची गरज नाही”, प्रकाश आंबेडकर यांचे मत; म्हणाले…
traders soybean goods are kept in sheds and farmers goods are kept in open place in market committee in yavatmal
यवतमाळ : अजब न्याय! शेतकऱ्यांचा माल बाहेर अन् व्यापाऱ्यांचा मात्र…
Congress state president Nana Patole criticizes Election Commission over assembly election results
निवडणूक आयोगाचे बिंग फुटू नये म्हणून… नाना पटोले म्हणतात, “मारकडवाडीत अत्याचारी ब्रिटिशांप्रमाणे…”
Seven developers application to government for withdrawal from SEZ project print eco news
सात विकासकांचा ‘सेझ’ प्रकल्पातून माघारीचा सरकारकडे अर्ज; पुणे, नागपूरच्या प्रकल्पांचाही समावेश

हेही वाचा…नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकाचे रूपडे पालटले ‘या’ नवीन नावाने…

या कामाची निविदा प्रक्रिया राबविताना सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे मिळणार नाही या पद्धतीने कार्यस्थळी भेट देऊन कार्यकारी अभियंत्यांची स्वाक्षरी घ्यायची. ती निविदा भरताना अपलोड करायची होती. प्रत्यक्षात स्वाक्षरी घेतल्यानंतर फार्मच अपलोड करण्यात आला नव्हता. निविदा प्रक्रिया राबवित असतानाच्या कालावधीत कार्यकारी अभियंत्यांचे दर्शन दुर्लभ झाले. त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावरही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना निविदाप्रक्रियेत सहभाग घेता आला नाही. त्यामुळे त्यांना आता कामेही मिळणार नाही. अशा प्रकारच्या अटी आधी कधीच टाकण्यात येत नव्हत्या. या जाचक अटीमुळे निविदाप्रक्रियेत आम्हाला सहभागी होता आले नाही. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष जगदिश लाबाडिया यांनी माध्यमांशी बोलतांना केली आहे.