वर्धा : सध्या कडाक्याची थंडी आहे.उबदार होण्यासाठी नागतिकांचा नाना वस्त्रे घालून थंडीला पळवून लावण्याचा प्रयत्न होत आहे.पण अनाथ, बेघर, गरीब वर्गास अशी उबदार वस्त्रे मिळतील, याची शाश्वती नाही.म्हणून वैद्यकीय जनजागृती मंचने अश्यावर उत्तर शोधले आहे.त्यास कारण पण आहे. २०१४ साली सेवाग्राम रेल्वे स्थानकावर एकाचा थंडीने गोठून बळी गेला होता. ही सुबुद्ध समाजासाठी लाजिरवाणी बाब म्हणून वैद्यकीय मंचने लोकांकडून ब्लँकेट मिळवत गरजूंना देणे सुरू केल्याचे मंचचे अध्यक्ष डॉ.सचिन पावडे नमूद केले.

दोनशे रुपयाची बचत करा आणि ब्लँकेट दान द्या, असे आवाहन केल्या जाते.एकाचाही थंडीने बळी जावू नये म्हणून मंचचे सेवक रात्री फिरून अनाथांना ब्लँकेट पांघरतात. या उपक्रमास प्रतिसाद देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader