शिक्षण, संशोधनाच्या नावावर विशिष्ट संस्थांच्या कार्यक्रमांचे आयोजन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
देवेश गोंडाणे, लोकसत्ता
नागपूर : जागतिक दर्जाचे संशोधन आणि १०० टक्के नोकरीची हमी, यासाठी प्रसिद्ध असलेली विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था अर्थात ‘व्हीएनआयटी’ हल्ली केंद्र सरकारला हितकारक अशा विशिष्ट विचारधारेच्या प्रसार-प्रसाराची जणू केंद्र झाली आहे.
‘शैक्षाणिक नेतृत्व’, ‘पुनरुत्थानासाठी संशोधन’ अशा गोंडस नावाखाली राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चर्चासत्रांतून व्हीएनआयटीद्वारे विशिष्ट विचारांची पेरणी केली जात असल्याचा आरोप होत आहे.
केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून देशातील शिक्षण संस्थांवर भाजपच्या मातृसंस्थेतील वेगवेगळया शाखांनी आपली पकड मजबूत करणे सुरू केले आहे. विविध कार्यक्रम, अभ्यासक्रमातील हस्तक्षेप, असे प्रकार सर्रास सुरू आहेत. असेच काहीसे चित्र ‘व्हीएनआयटी’तही पहायला मिळत आहे. मध्यभारतातील तंत्रशिक्षण संस्था म्हणून व्हीएनआयटीची जागतिक ओळख आहे. १९६० मध्ये स्थापन झालेल्या या तंत्रशिक्षण संस्थेतील अनेकांनी जगभरात नावलौकिक मिळवला. संस्थेचा शैक्षणिक आणि संशोधनाचा दर्जा आजही कायम आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे शिक्षण आणि संशोधनासह विशिष्ट विचारांनी प्रेरित संस्थांच्या कार्यक्रमातून ‘पुराणातील वांगी’ शोधण्याचे काम सुरू असल्याचा आरोप होत आहे.
भारतीय शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१६ ला व्हीएनआयटीमध्ये ‘पुनरुत्थानासाठी संशोधन’ या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. संशोधनातून मूळ भारतीयत्व पुढे आणण्याचा व भारत जगतगुरू कसा होता, हे सांगण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले होते. विशेष म्हणजे, परिसंवादास ‘ज्ञानयज्ञ’, शोधनिबंध सादरीकरणास ‘समिधा’ तर बीजभाषणास ‘आहुती’ असे नाव देण्यात आले होते. तथ्य आणि सूत्रांच्या आधारावर जागतिक दर्जाचे संशोधन करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या व्हीएनआयटीमधील या प्रयोगास त्यावेळीही विरोध झाला होता.
करोनामुळे मधल्या दोन वर्षांत आयोजन थांबले. मात्र, अलीकडेच व्हीएनआयटी, भारतीय शिक्षण मंच तसेच रिसर्च फॉर रिसर्जन्स फाऊंडेशन-आरएफआरएफ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘शैक्षाणिक नेतृत्व’ परिषद घेण्यात आली. या दोन दिवसीय परिषदेतही संशोधन आणि विज्ञानवादाला फाटा देत विशिष्ट विचारांची पेरणी करण्याचेच काम केले गेले. त्यामुळे व्हीएनआयटी हल्ली विशिष्ट विचारधारेच्या संस्थांचा प्रचार, प्रसार करीत असल्याचा आरोप शैक्षणिक वर्तुळातून होत आहे.
संचालकांच्या भूमिकेवरही आक्षेप
परिश्रमी संशोधक आणि नैतिकतेचे काटेकोरपणे पालन करणारे प्रशासक म्हणून व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांची ओळख आहे. मात्र, डॉ. पडोळे यांच्या कार्यकाळातच विशिष्ट विचारांच्या कार्यक्रमांना प्रोत्साहन दिले जात असल्याने त्यांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला जात आहे. त्यांच्याच काळात येथील सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या कंपनीचे कंत्राटही विशिष्ट विचारधारेच्या नजिकच्या व्यक्तीला देण्यात आल्याचा आरोप झाला होता.
डॉ. पडोळेंकडून प्रतिसाद नाही
यासंदर्भात विचारणा करण्यासाठी व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांच्याशी अनेकदा संपर्क साधूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांना यासंदर्भात संदेश पाठवूनही त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली नाही.