यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान सुरू असताना यवतमाळ शहरातील छोटी गुजरी परिसरात मतदारांच्या बोटावर शाई लावून मतदान न करताच पैसे वाटत असताना काही व्यक्तींना निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणात भाजपचे काही कार्यकर्ते प्रत्यक्ष आरोपी असल्याने प्रशासनाकडून कारवाई करण्यात दिरंगाई होत आहे. भाजपने अनेक ठिकाणी समांतर निवडणूक यंत्रणा चालवून निवडणूक विभागाची फसवणूक केली, असा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी केला.

शुक्रवारी मतदान सुरू असताना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शहरातील छोटी गुजरी, पाटीपुरा, तेलीपुरा आदी भागात भाजपचे काही कार्यकर्ते मुस्लीम, दलित मतदारांच्या बोटावर शाई लावून त्यांना ५०० रूपये देऊन रजिस्टरमध्ये त्यांची नावे नोंदवित असल्याबाबत माहिती मिळाली. त्यावरून आपण निवडणूक विभागाच्या भरारी पथकातील पाथ्रटकर यांना घेऊन घटनास्थळी गेलो तेव्हा सुलेमान नावाची व्यक्ती हा प्रकार करीत असल्याचे आढळले, असे पत्रकार परिषेत शिवसेना उबाठाचे संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Kasba Constituency, Ravindra Dhangekar,
विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे : रविंद्र धंगेकर
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Controversial statement, Kunbi, political atmosphere, Wani yavatmal
वणी : न घडलेल्या प्रकाराने राजकीय वातावरण ढवळून निघाले; कुणबी समजाबद्दलच्या वक्तव्यात बोलविता धनी कोण?

हेही वाचा…मतदान न करणाऱ्यांविरोधात नागपुरात संताप…..

भाजपचे बंटी जयस्वाल, आणि शेखर ब्राह्मणे यांनी सुलेमानला भरारी पथकाच्या ताब्यातून पळवून नेल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. याबाबत आपल्यासमोर भरारी पथकाचे पाथ्रटकर यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांना सत्ताधाऱ्यांच्या दबावात या प्रकरणी केवळी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे गायकवाड म्हणाले. प्रशासन आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी संजय देशमुख यांनी केला. मतदान प्रक्रियेची समांतर यंत्रणा राबवून भाजपने जिल्ह्यात अनेक ठिकाणी असा प्रकार केल्याचा आरोपही देशमुख यांनी केला आहे. भाजपच्या या कार्यकर्त्यांजवळ शासकीय प्रक्रियेतील शाई कुठून आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भरारी पथकाने जप्त केलेल्या रजिस्टरमध्ये पैसे घेणाऱ्या ४१ व्यक्तींची नावे आढळली असून ही सर्व नावे, दलिम, मुस्लीम समाजातील असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

भाजप, शिवसेना, राकाँ हे महायुतीतील सर्वच पक्ष या प्रकरणात सहभागी असून हा पूवनियोजित कट होता. निवडणूक विभागाच्या व्यक्तीने तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, ठाणेदार या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी केली. एक विशिष्ट समाज मतदानापासून वंचित राहावा यासाठी भाजपने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मतदानाच्या तारखा घोषित केल्या. सात टप्यांमध्ये शुक्रवारीच बहुतांश वेळा मतदान होणार असल्याचे पुरके यावेळी म्हणाले. शुक्रवार हा मुस्लीम बांधवांचा प्रार्थनेचा दिवस असल्याने ते मतदानापासून वंचित राहावे, हा भाजपचा छुपा अजेंडा असल्याचा आरोप पुरके यांनी यावेळी केला. पत्रकार परिषदेस काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे, बाळासाहेब मांगुळकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा…बुलढाणा: खासगी बस दरीत कोसळली… २८ प्रवासी जखमी

अदखलपात्र गुन्हा दाखल

यवतमाळ शहर पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. भरारी पथकाने कारवाई करत सुलेमान खान हसन खान (४०, रा. सेवादास नगर) यांच्याकडून शाई, रजिस्टर, पेन, ब्रश ताब्यात घेतला. यावेळी सुलेमान याला बंटी उर्फ आनंद जयस्वाल (५०, रा. छोटी गुजरी) आणि शेखर ब्राह्मणे (४०, सेवादास नगर) यांनी फॉर्च्युनर वाहन (क्र. एमएच२९, बीपी ५६७०) यात बसवून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. पोलिसांनी ही तक्रार अत्यंत गुळमिळीत आणि संभ्रम निर्माण होईल, पद्धतीने लिहिल्याचा आरोप राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.