नागपूर: नागपूर लोकसभा मतदार संघातील हैदराबाद हाऊस या मतदार केंद्रात शुक्रवारी सकाळी मतदारांचा पत्त्याबद्दल गोंधळ उडाला. त्यामुळे मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्या हैदराबाद मध्ये मतदान करावे, हे कसं समजणार असा प्रश्न उपस्थित केला.

नागपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. पश्चिम नागपूर मतदार संघातील प्रियदर्शनी कॉलनी, सिव्हिल लाईन्स परिसरातील नागरिकांना हैदराबाद हाऊस या पत्त्यावर मतदान केंद्र दिल्याची शासकीय चिठ्ठी आली होती. त्यानुसार नागरिक मतदानासाठी सकाळपासून घराबाहेर पडणे सुरू झाले. सिव्हिल लाईन्स परिसरात प्रत्यक्षात दोन हैदराबाद हाऊस आहेत. त्यात नवीन आणि जुन्या हैदराबाद हाऊसचा समावेश आहे. शासकीय चिठ्ठ्यांवर कुठेही नवीन व जुना असा उल्लेख नव्हता. त्यामुळे नागरिक गोंधळले. शोधाशोध केल्यावर मतदार केंद्रावर पोहचणाऱ्या मतदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्त्याच्या गोंधळाबाबत संताप व्यक्त केला.

Municipal employees sealing a property in Kalyan East
कल्याण पूर्वेत थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
Woman police officer abused for not taking action on vehicle
पिंपरी : कारवाई करू नये म्हणून महिला पोलिसाला शिवीगाळ
taloja housing project fraud case court takes serious note of the plight of flat buyers
तळोजास्थित गृहप्रकल्प कथित फसवणूक प्रकरण : सदनिका खरेदीदारांच्या दुर्दशेची न्यायालयाने घेतली गंभीर दखल
Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
mhada lottery 2024 konkan board extend application deadline for 2264 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया

हेही वाचा…भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना ‘या’ विधानसभा क्षेत्रातून सर्वाधिक मताधिक्याची अपेक्षा

या मतदान केंद्राच्या बाहेर हैदराबाद हाऊस असा उल्लेख असलेला साधा फलकही नसल्याबाबत मतदारांनी नाराजी व्यक्त केली. येथे मुख्यमंत्री सचिवालय असे फलक आहे. त्यामुळे लोकांना हेच हैद्राबाद हाऊस असल्याचे कसे कळणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तातडीने येथे फलक लावण्याची गरज विशद केल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्याच्या आश्वासन दिले. परंतु सुमारे एक ते दीड तास या मतदान केंद्राच्या द्वारावर कुणा कर्मचाऱ्याला माहिती देण्यासाठी नियुक्त करण्यात आले नसल्याचे मतदारांनी सांगितले. नवीन आणि जुन्या हैदराबाद हाऊस मतदान केंद्राच्या गोंधळामध्ये सर्वसामान्य मतदारांची फरफट झाली.

Story img Loader