चंद्रपूर :विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील ६ विधानसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी प्राप्त झाली असून, त्यानुसार जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक, तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान होत आहे. .सकाळी ९ वाजेपर्यंत चिमूर परिसरात सर्वाधिक १०.२६ टक्के, तर चंद्रपूर परिसरात सर्वात कमी ४.७८ टक्के मतदान झाले. इतर भागात सकाळी ९ वाजेपर्यंतच्या मतदानानुसार बल्लारपूरमध्ये ८.८२ टक्के, राजुरा येथे ८.७८, ब्रह्मपुरी ९.२६ आणि वरोरा येथे ७.२९ टक्के मतदान झाले आहे.
First published on: 20-11-2024 at 11:52 IST
© The Indian Express (P) Ltd
© The Indian Express (P) Ltd
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting began at 7 am chimur constituency had highest and chandrapur had lowest polling till 9 am rsj 74 sud 02