नागपूर : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी पूर्व विदर्भातील वर्धा व पश्चिम विदर्भातील यवतमाळ-वाशीम, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या एकूण पाच मतदारसंघांत दुपारी ५ वाजेपर्यंत सरासरी ५३ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही विदर्भात मतदानाची टक्केवारी कमी राहिली. मराठवाडय़ातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या तीन मतदारसंघांत पाच वाजेपर्यंत सरासरी ५३.७९ टक्के मतदान झाले. मतदारांचा निरुत्साह आणि वाढत्या उन्हाच्या ‘झळा’ टक्केवारीला बसल्या असल्या असून याचा निकालावर काय परिणाम होईल, याची उत्कंठा आहे. 

विदर्भात सरासरी ४० अंश तापमान असल्याने दुपारच्या सत्रात मतदानासाठी केंद्रांवर गर्दी कमी होती. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी अनेक ठिकाणी रांगा दिसल्या. दुपारी एकपर्यंत पाचही मतदारसंघांत सरासरी ३० टक्के मतदानाची नोंद झाली होती. तीनपर्यंत त्यात वाढ होऊन ते ४०.०१ टक्के झाले. पाच वाजेपर्यंत सरासरी ५३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.  अमरावतीत साईनगर भागातील मतदान केंद्रात प्रवेश करण्याच्या मुद्यावरून भाजपच्या नवनीत राणा व शिवसेनेच्या माजी नगरसेविका मंजूषा जाधव यांच्यात वाद झाला. यवतमाळ-वाशीम मतदारसंघात हिवरी येथे मतदान सुरू असताना केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नाष्टा करण्यासाठी मतदान थांबवले. अकोल्यात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील, अमरावतीत नवनीत राणा, काँग्रेसचे आ. बळवंत वानखडे, बुलढाण्यात प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडेकर, वध्र्यात रामदास तडस, अमर काळे, यवतमाळ-वाशीमध्ये राजश्री पाटील व संजय देशमुख यांच्यासह २०४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.

Maharashtra assembly elections
विश्लेषण: उमेदवारांच्या गर्दीमुळे छोट्या पक्षांची मते निर्णायक; समीकरणे कशी आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Congress tradition continues, assembly election 2024
कॉंगेसची ‘विलंब’ परंपरा, नावे जुनीच, घोषणेला उशीर
polling stations Pune district, Pune district remote areas, Pune, Pune latest news,
पुणे : जिल्ह्यातील ३८ मतदान केंद्रे दुर्गम भागात, ‘मोबाइल नेटवर्क’ही मिळेना
This election is likely to show the danger of NOTA for political parties
‘नोटा’चा धोका!
Marathwada vidhan sabha
सलग निवडून येणाऱ्या महायुतीतील १५ आमदारांना जनमत रोषाचा फटका ?
maha vikas aghadi accuses bjp of altering voter lists ahead of maharashtra assembly polls
मतदार याद्यांवरून मविआ – महायुतीत रणकंदन;मालेगावातील नावे नाशिक मध्य मतदारसंघात नोंदविल्याची भाजपची तक्रार
assembly elections are announced there is a warning to boycott the election polls solhapur news
निवडणूक जाहीर होताच मतदानावर बहिष्काराची इशारेबाजी सुरू; हराळवाडी ग्रामस्थांचा पाणी प्रश्नावर इशारा

हेही वाचा >>>वर्धा: अंतिम आकडेवारीवर अवकाळी पावसाचे सावट

दुपारी मराठवाडय़ात शुकशुकाट

मराठवाडय़ात परभणी, नांदेड आणि हिंगोली येथे सकाळी आणि संध्याकाळी उशीरा मतदानकेंद्रांवर रांगा होत्या. मात्र दुपारच्या वेळात बहुतांश ठिकाणी शुकशुकाट होता. दुपापर्यंत अपेक्षित मतदानाची टक्केवारी न गाठल्याने प्रमुख उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती. त्यानंतर कार्यकर्त्यांची यंत्रणा गतिमान झाली. काही केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.

टक्के मतदान

लोकसभा मतदार संघात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. मतदानादरम्यान तीन ठिकाणी मतदान यंत्र बदलावे लागले. किनवट विधानसभेत दोन ठिकाणी मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला. मात्र, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर दुपारनंतर मतदान सुरू झाले आहे. औंढा तालुक्यातील पिंपळदरीत एका महिलेच्या नावे बोगस मतदान झाल्याचे स्पष्ट झाले.

ईव्हीएममध्ये बिघाड

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३वर मतदानयंत्रात बिघाड झाल्याने मतदानाला विलंबाने सुरुवात झाली. त्याचप्रमाणे अमरावती शहरातील रुक्मिणीनगरमधील एका शाळेत (केंद्र. क्र.१९) खोली क्रमांक पाचमध्ये ईव्हीएम बंद पडले.

हेही वाचा >>>माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा? आदर्श आचारसंहिता…

मेळघाटातील सहा गावांचा बहिष्कार

मेळघाटातील रंगूबेली धोकडा, कुंड, खामदा अशा सहा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. येथील नागरिकांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनाकडून बरेच प्रयत्न करण्यात आले. मात्र ग्रामस्थ ठाम राहिले. रस्त्यांची दुर्दशा, वीज, पाणी, आरोग्य सेवांचा अभाव या कारणाने ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी आणि निवेदने सादर करूनही या प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

मतदान न करण्यासाठी पैसे?

यवतमाळ शहरातील छोटी गुजरी परिसरात मतदारांच्या बोटावर शाई लावून व त्यांना पैसे देऊन मतदान न करण्याचे आवाहन करताना एका व्यक्तीला पकडण्यात आले. शिवसेनेचे (ठाकरे गट) संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी यासंदर्भात पोलिसांनी तक्रार घेतली नसल्याचा आरोप केला.

‘मशाली’चे बटण; ‘धनुष्यबाणा’ला मत?

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव केंद्रावर ‘मशाल’ चिन्हापुढचे बटण दाबवल्यावर व्हीव्हीपॅटमध्ये ‘धनुष्यबाण’ अंकित होत असल्याची तक्रार मतदार नितीन बोंद्रे यांनी तहसीलदारांकडे केली. त्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्र बदलून देण्यात आले.

मतदारसंघनिहाय टक्केवारी

५६.६६% वर्धा

५२.४९% अकोला</p>

५४.५०% अमरावती

५२.२४% बुलढाणा

५४.०४ % यवतमाळ-वाशीम

६५% नांदेड

६२% हिंगोली

६३% परभणी