कारधा पूल(जुना) येथे वैनगंगा नदीची पाणी पातळी ईशारा पातळी जवळ येत असल्याने सखल भागात राहत असलेल्या नागरिकांनी इतरत्र स्थलांतरित होण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. वैनगंगा नदीची ईशारा पातळी ही २४५ मी. व धोका पातळी २४५.५० मी. असून आज सायंकाळी ७ वाजता २४४.७० मी. पाणी पातळीची नोंद घेण्यात आली आहे.

हेही वाचा >>> गोंदिया: इटियाडोह धरण ‘ओव्हर फ्लो’च्या उंबरठ्यावर! दमदार पावसामुळे ९५ % पाणीसाठा

वैनगंगा नदीची (भंडारा) ईशारा पातळी जवळ येत असल्याचे दिसून येत आहे. तसेच धापेवाडा धरणाचे विसर्ग (८७३९.३८ क्युमेक्स) पाहता इशारा पातळी‌ ओलांडण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेनुसार तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.

Story img Loader