राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : राज्यातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प गोसीखुर्दची निधीबाबतची प्रतीक्षा काही संपताना दिसत नाही. चालू आर्थिक वर्षांत साडेसातशे कोटींची कामे करण्यात आली. परंतु, शासनाकडून केवळ अडीचशे कोटी रुपये प्राप्त झाले.

In Khambhadi Koturli village Bhandara district sighting of tiger in broad daylight has created excitement among the villagers
भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर

राज्य सरकारने हा प्रकल्प जून २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे नवीन लक्ष्य ठेवले आहे. माजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पासाठी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात १५०० कोटी रुपयांची तरतूद केली. चालू आर्थिक वर्षांत सुमारे २२०० ते २३०० कोटींची कामे सुरू असून सुमारे साडेसातशे रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत. वित्त विभागाने २५३ कोटी रुपये जलसंपदा खात्याला वितरित केले आहेत. आणखी पाचशे कोटी रुपये ऑगस्ट २०२३ पर्यंत येणे अपेक्षित आहे. कामाची गती कायम ठेवण्यासाठी नियमित निधी पुरवठा होणे आवश्यक असते, असे मत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.

आणखी वाचा-जगातील सर्वात मोठ्या ‘संगीत कारंजी’ प्रकल्पाला किड्यांचा वेढा!

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पासाठी २०२२-२३ आर्थिक वर्षांत ८५६.४५ कोटींची तरतूद केली होती. त्यापैकी ८३५.७६ कोटी दिले होते. वास्तविक यावर्षी देखील या प्रकल्पाला १५०० कोटींची गरज होती. राज्य सरकार गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण करण्याची तारीख वारंवार वाढवत आहे,असेलोकनायक बापूजी अणे स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड. अविनाश काळे म्हणाले

Story img Loader