बुलढाणा: मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेल्या बुलढाणा व लोणार तालुक्यात व एकूण ७३ महसूल मंडळात विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहे. यामुळे लाखो बाधित शेतकरी व नागरिकांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे.

जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी ही माहिती दिली. शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार बुलढाणा जिल्ह्यातील ११ तालुक्यामधील ७३ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. बुलढाणा व लोणार तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा… कुटुंबाच्या सामूहिक विष प्राशनाच्या अफवेने खळबळ; प्रत्यक्षात झाले वेगळेच…

दुष्काळ घोषित झालेल्या तालुक्यांना विविध सवलती लागू करण्यात आल्या आहे. जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या चालू विज बिलात ३३.५० टक्के सूट, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आदि सवलती लागू करण्यात आल्या आहे. तसेच आवश्यक तेथे पाणी पुरवठ्यासाठी टँकरचा व शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची विज जोडणी खंडीत न करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले.

Story img Loader