नागपूर : खंडणीचा गुन्हा दाखल असलेला आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात हात असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडला अटक करता न येणे हे भाजपा सरकारचे अपयश आहे. या घटनेमुळे फडणवीस यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून कायदा-सुव्यवस्था राखण्यात ते अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.

महाराष्ट्र पोलिसांचा मोठा दबदबा व नावलौकिक आहे, मुंबई पोलिसांची तुलना तर स्कॉटलंड यार्डशी केली जायची. अशा सक्षम पोलीस दलाची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी २० दिवस पोलीस व सीआयडीला सापडला नाही तो शरण आला हे पोलीस दलाचे अपयशच आहे. बीडमधील संघटीत गुन्हेगारीचा गंभीर प्रकार पाहता या प्रकरणाचा तपास विद्यमान न्यायमूर्ती यांच्या देखरेखीखाली झाला पाहिजे, अशी मागणीही अतुल लोंढे यांनी केली आहे.

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश
nitin raut Devendra fadnavis
गुंडांना खुद्द मुख्यमंत्र्यांचे संरक्षण, डॉ. नितीन राऊत म्हणाले…
62 percent of ministers in the state cabinet have criminal backgrounds print politics news
राज्य मंत्रिमंडळात ६२ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
Burning of Amit Shahs symbolic effigy in akola
अमित शहांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, अकोल्यात वंचित आक्रमक; राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम
Vishwanath Baburao Chakote , Former MLA Complaint ,
काँग्रेसच्या माजी आमदाराची शेतजमीन भाऊ, पुतण्याने लाटली; सोलापुरात गुन्हा

हेही वाचा – संतनगरीत भाविकांची मंदियाळी! आज मंदिर रात्रभर राहणार खुले

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, राज्यातील पोलीस दल व सीआयडी आजही सक्षम आहेत पण ते राजकीय दबावाखाली असल्याने त्यांचे मनोबल कमजोर होते. आरोपीला पोलीस पकडू शकत नाही, तो शरण येतो ही लाजीरवाणी व दुर्दैवी बाब आहे. बीड प्रकरणाने सक्षम नेतृत्व म्हणून गवगवा केला जात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्यादाही राजकारणापुढे स्पष्ट झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पदावर राहण्याचा काय अधिकार आहे? नागपूरमध्ये ७ दिवसांत ७ खून झाले आहेत, त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा व माध्यमातून स्वतःचे कौतक थांबवावे असेही अतुल लोंढे म्हणाले.

हेही वाचा – पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडचे आत्मसमर्पण, वडेट्टीवारांचा दावा

भाजपचे आमदार म्हणतात ‘गँग्ज ऑफ वासेपूर’

बीड प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे आमदारच सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करत आहेत. बीडमधील गुन्हेगारीला सत्ताधारी पक्षाचे आमदार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ म्हणतात. बीडमधील गुन्हेगारीला आळा घालून राजकीय आशीर्वादाने फोफावलेली ही विषवल्ली कायमची नष्ट करा व यामागे ज्यांचा हात आहे त्यांनाही अद्दल घडवावी असे अतुल लोंढे म्हणाले.

Story img Loader