नागपूर : सरपंच संतोश देशमुख यांच्या निर्घृण खून झाल्याचा आणि गुन्ह्यात वाल्मिक कराड सहभागी असल्याचा आरोप विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सर्वच पक्षांच्या आमदारांनी केला होता. एवढेच नव्हेतर वाल्मिक कराड यास राज्याच्या एका मंत्र्याचा आशीर्वाद असल्याचा आरोप देखील झाला होता. तरी देखील पोलिसांनी कराड याला अटक केली नव्हती. अखेर त्याने मंगळवारी पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्ण केले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सातत्याने वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या खुनाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला होता. अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षाच्या नेत्यांनीही आरोप केले. सरकारकडून गुन्हेगारांना सोडणार नाही. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढू, असे आश्वासन अधिवेशनात आणि त्यानंतरही दिले गेले. परंतु ज्याच्यावर आरोप होते. त्याला पोलिसांनी पडकले नाही. शिवाय संतोश देशमुख खून प्रकरणात त्याला सहआरोपी देखील करण्यात आले नाही. या खुनाच्या घटनेपूर्वी तेथे खंडणीचा गुन्हा घडला होता. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा आहे. वाल्मिक कराड मंगळवारी पुण्यात सीआयडीला शरण आला. त्यापूर्वी तो फरार होता. त्याचे देशाच्या विविध भागांत वास्तव्य केले. हिवाळी अधिवेशनाच्या काळात त्याचा मुक्काम नागपुरातही एका फार्म हाऊसवर असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला होता. काही दिवसांनी त्याने स्वत: उज्जेनला असल्याचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित केले. आत्मसमर्पण करणार असल्याची चित्रफित देखील प्रसारित केली आणि नंतर आत्मसमर्पण केले. हा सगळा घटनाक्रम बघता विरोधक आक्रमक झाले आहे.
हेही वाचा – …तर नागपुरातच सापडला असता वाल्मिक कराड!
माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार एक्सवर पोस्ट करून सरकारवर टीका केली. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलीस, सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आत्मसमर्पण होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून आला. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही. इतके दिवस वाल्मिक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून त्याने आज आत्मसमर्पण केले. या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे.
हेही वाचा – सोने-चांदीच्या दरात घसरण… सरत्या वर्षात…
महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत का? या वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की आत्मसमर्पण होण्याआधी हा चित्रफित प्रसारित करतो आणि स्वतःला क्लिनचीट देतो, यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचे स्पष्ट आहे. या प्रकरणी पोलिसांनी जे ‘कर्तृत्व’ दाखवले आहे ते पाहता पोलीस, सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कोणीही दबाव टाकणार नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.