नागपूर: अनेकदा घरातील नकारात्मक ऊर्जा लोकांना आळशी आणि उदास बनवते. एखाद्या व्यक्तीच्या वागण्यात कटुता निर्माण करते. बऱ्याचदा यामुळे नैराश्य येते. कामान लक्ष न दिल्याने तिथेही अपयश पदरी पडते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागल्यास एक नव्हे तर अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. त्यामुळे वेळीच ही नकारात्मकता दूर करणे गरजेचे असते. घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करणे किंवा काढून टाकणे म्हणजेच घरात सकारात्मक ऊर्जा तयार करणे. यासाठी वास्तू शास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे घरात सकारात्मकता वाढण्यास मदत होईल.
अनेकदा आपण आयुष्यात सकारात्मक राहण्याचा खूप प्रयत्न करतो. मेहनतीने आणि प्रामाणिकपणे रोजची काम करतो. मात्र त्यानंतरही अनेकदा घरातील वातावरण किंवा घरातील ऊर्जा आपल्यात नकारात्मकता निर्माण करत राहते. यामुळे घरातील सदस्यांमध्ये तसचं रोजच्या आणि महत्वाच्या कामांमध्ये सतत अडचणी येत राहतात. परिणामी घरामध्ये ताण वाढत जातो. त्यामुळे या काही घरघुती टिप्स वापरा.
धूर करा
एका दिव्यामध्ये तूप, कापूर आणि लवंग घेऊन त्याचा धूर घरात पसरू द्या. यामुळे लवकरच घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल
मिठाचा प्रयोग करा
वास्तू शास्त्रानुसार मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा खेचण्याचा गुण आहे. त्यामुळेच घरात मिठाचा वापर प्रभावी ठरतो. यासाठी घरातील फरशी पुसताना पाण्यामध्ये थोड मिठ टाकावे. यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते. मात्र गुरुवारी हा प्रयोग करू नये.
सूर्य प्रकाश आणि ताजी हवा
वास्तू शास्त्रानुसार घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी घरात जास्त अंधार असू नये. यासाठी घरातील खिडक्या आणि दारं उघड्या ठेवणं गरजेचे आहे. जेणेकरून घरात पुरेसा सूर्यप्रकाश येईल त्याचसोबत घरात हवा देखील खेळती राहिल.