नागपूर : युद्धाच्या ठिणग्यांत अडकलेल्या युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांना तातडीने भारतात परतायचे आहे. गेल्या चोवीस तासांपासून भवताली होत असलेला वायूसेनेच्या विमानांचा गोंगाट, तोफगोळय़ांचे आवाज या विद्यार्थ्यांना अस्वस्थ करीत आहेत. नागपूरचा पवन मेश्राम आणि वैष्णवी वानखेडे यांनी तेथील थरार ‘लोकसत्ता’ला सांगितला.

  वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या पवन आणि वैष्णवीने दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही आठ हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतामधील त्यांचे पालक मुलांच्या परतण्याची आस लावून बसले आहेत.

Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
Hindra Thakur Vasai program, Hindra Thakur,
वसई : ‘आमने सामने’ कार्यक्रमात ठाकुरांचेच वर्चस्व, हितेंद्र ठाकुरांसमोर विरोधक फिरकलेच नाहीत
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?

वैष्णवी वानखेडे ही पश्चिम युक्रेनच्या टर्नोपिल येथे वास्तव्याला असून भारतात परत येण्यासाठी भारतीय दूतावासाशी सतत संपर्क सुरू असल्याचे तिने सांगितले. पवन मेश्राम  पश्चिम युक्रेनमधील इव्हानो फ्रँकव्हिस्क या शहरात राहत असून तूर्तास येथे युद्धाची थेट झळ पोहोचलेली नाही. परंतु, ५०० किलोमीटरवर असलेले युक्रेनची राजधानी किव्ह शहर मात्र हादरले आहे. तिकडे बॉम्बहल्ला झाल्याने सर्व विद्यार्थी घाबरले आहेत. भारतात असलेले आमचे पालक प्रचंड चिंतेत असून वाटेल तितके पैसे खर्च करून परत या अशा सूचना देत आहेत. मात्र, आता युद्ध सुरू झाल्याने ते शक्य नाही, असे पवन म्हणाला.  युक्रेनमध्ये भारतीयांची संख्या सुमारे २० हजार आहे. मात्र, युद्धाची परिस्थिती आणि ऑनलाइन वर्ग असल्याने काही विद्यार्थी आधीच आपल्या राज्यात परत गेले आहेत. महिनाभरापासून युद्धाची स्थिती असल्याने साधारण तीन हजार विद्यार्थी भारतात परतले. तरीही सध्या आठ ते दहा हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये आहेत.

विद्यार्थ्यांचे भीतीदायक अनुभव

युक्रेनमध्ये अडकलेल्या काही विद्यार्थ्यांनी युद्धाचे भीतीदायक अनुभव सांगितले. ‘‘पहाटे चार वाजता मला जाग आली तेव्हा काही अंतरावर बॉम्बस्फोट होत असल्याचा आवाज येत होता. बॉम्बवर्षांवाचा आवाजाने भीतीदायक वातावरण निर्माण झाले,’’ असे आकांक्षा कटियार ही विद्यार्थिनी सांगत होती. आकांक्षा खार्किव विद्यापीठात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. याच विद्यापीठात शिक्षण घेणारा अरुण राज सांगतो, सकाळी युद्धाची बातमी समजल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शहरातील अनेक नागरिक आणि विद्यापीठातील विद्यार्थी शहर सोडून जात असून आम्हालाही भारतात पाठवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सर्व भारतीय एकमेकांच्या संपर्कात

युक्रेनमध्ये महाराष्ट्रातील अनेक मुले असले तरी महाराष्ट्र मंडळासारखे तेथे काही नाही. मात्र, ‘इंडियन्स इन युक्रेन’ नावाची एक संस्था आहे. विविध समाज माध्यमांद्वारे आम्ही या संस्थेशी जोडले गेलो आहोत, असे पवन म्हणाला.

आम्ही भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत. एअर इंडियाची विमाने उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. तिकिटांचे दर कमी करता येईल का, यासंदर्भात आम्ही त्यांना विनंती करीत आहोत.

   – युक्रेनमधील भारतीय विद्यार्थी