वर्धा: भारतीय चलनातील नोटांचा चुरा (स्क्रॅप) भरुन उत्तरप्रदेशला जाणाऱ्या ट्रकला वर्धा जिल्ह्यातील कांढळी-बरबटी गावाजवळ आग लागली. या आगेत नोटांचा चुरा जळून खाक झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. ट्रक भरून नोटा जळाल्याची माहिती पसरल्यामुळे गावकऱ्यांसह वाहनचालकांनीही गाड्या थांबवून गर्दी केली. तातडीने पोलीस, प्रशासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच आसपासच्या गावातील लोकांनी या ठिकाणी गर्दी केली. तर्कवितर्क लावले जाऊ लागले.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ठिकठिकाणी पोलिसांच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर रोकड पकडली जात आहे. १६ चाकांचा ट्रक (यूपी १२ सिटी ५३२७) हैदराबाद येथून उत्तरप्रदेश-मुजफ्फरनगरच्या दिशेने जात होता. या ट्रकमध्ये विविध प्रकारच्या नोटांचा तुकड्यांचा कचरा (स्क्रॅप) होता. वर्धा जिल्ह्यातील कांढळी गावाजवळून ट्रक जात असताना शॉर्टसर्किटने या ट्रकला आग लागली. त्यामुळे आतील नोटांच्या कचरा जळून खाक झाला. दरम्यान, अग्नीशमन दलाच्या वाहनांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच या स्क्रॅप मालाचा लिलाव केला होता. त्यानुसार, हा माल नेला जात होता. वर्धा जिल्ह्यातील सिंदी पोलीस यासंदर्भात अधिक तपास करीत आहेत. ट्रकचालक जसवंतसिंह त्रिलोकसिंह (४५, मेरठ-उत्तरप्रदेश) आणि सहकारी भोपाळ दत्ताराम या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी भारतीय चलनी नोटांचा कचरा असल्याचे पोलिसांना सांगितले.

Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Sharad Pawar on age
Sharad Pawar : “मी काय म्हातारा झालोय का? इथं एक म्हातारं…”, शरद पवारांचा मिश्किल सवाल; म्हणाले, “या लोकांच्या हाती…”
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – या अपक्ष उमेदवाराला निवडणुकीसाठी अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दिली एक महिन्याची पेन्शन

सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यातही राज्यभर लाखो रुपये निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकांकडून जप्त केले जात आहेत. मतदारांना आमिष दाखवून किंवा पैसे देऊन मत मिळविण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणून पोलीस आणि जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यातच ट्रकभर नोटा असलेल्या ट्रकचा अपघात झाला आणि ट्रकमधील नोटांना आग लागल्याची अफवा पसरली. त्यामुळे बरबटी-कांढळीसह अन्य आजुबाजूंच्या गावाजवळील नागरिकांनी अपघातस्थळावर एकच गर्दी केली. मात्र, जळालेल्या नोटा नसून नोटांचा कचरा असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे अनेक जण आल्यापावली परत गेले.

हेही वाचा – काँग्रेसची सध्याची अवस्था ‘चाची ४२०’ प्रमाणे, मुनगंटीवार यांची टीका

भारतीय चलनातील नोटांचा कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्यानंतर अनेकांनी आपापली वाहने थांबवून अपघात बघण्यासाठी गर्दी केली. काहींनी ट्रकच्या आजुबाजूला पडलेल्या नोटांचा चुरा जमा केला. तर ट्रक रस्त्याच्या मधोमध असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. तासाभरानंतर हा रस्ता सुरळीत झाला.

Story img Loader