वर्धा : नगर विकास विभागाच्या नमो ११ कलमी कार्यक्रमात शहर सौंदर्यीकरण केल्या जाणार आहे. त्यासाठी वर्धा जिल्ह्यातील वर्धा व देवळी या दोन पालिकांची निवड करण्यात आली आहे. एकूण ७३ शहरांची निवड करण्यात आली आहे. त्यात २५ महानगर पालिका व ४८ नगरपालिकांचा समावेश असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – चंद्रपूर: अज्ञात वाहनांच्या धडकेत बिबट्या व कोल्ह्याचा मृत्यू

हेही वाचा – आघाडी सरकारद्वारे सुरुवात, विद्यमान सरकारकडून विस्तार

अभियान यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, समाजसुधारक, प्रसिद्ध व्यक्ती यांची स्वच्छतादूत म्हणून नेमणूक होईल. तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षकांना सहभागी केले जाणार आहे. नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे अभियान पूरक ठरणार. यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन तडस यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha and deoli two municipalities of wardha district will be beautified pmd 64 ssb