स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी बावीस लाखांची रक्कम लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. वर्धा ते हिंगणघाट मार्गावरील बोरगावमधील एटीएम फोडण्यात अपयशी ठरलेल्या चोरट्यांनी वायगावमध्ये एटीएम फोडून बावीस लाख लंपास केले.

हेही वाचा >>> उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी केली नागपूर विद्यापीठातून ‘एमकेसीएल’ची हकालपट्टी; कुलगुरुंसह अधिकाऱ्यांची होणार चौकाशी

Cash theft of four lakhs by breaking the door of the clothing store pune news
वस्त्रदालानाचा दरवाजा उचकटून पावणेचार लाखांची रोकड चोरी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
flying squad, seizes more than 2 crore rupees, maharashtra assembly election 2024
वसई-विरार पालिका परिसरात सलग दुसर्‍या दिवशी पैशांचा पाऊस, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
cash seized in Vasai, Mira Road,
वसई, मिरा रोडमध्ये ७ कोटी ८० लाखांची रोकड जप्त, एटीएम व्हॅनमध्ये संशयास्पद बेकायदेशीर रोकड
three crores found in atm van
नालासोपार्‍यात एटीएम व्हॅन मध्ये आढळले साडेतीन कोटी रुपये, गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू

चोरट्यांनी सावधगिरी म्हणून मशीनजवळील ‘सीसीटीव्ही’वर काळा रंग फासला. बोरगाव येथे चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रथम प्रयत्न केला. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा पुढे याच मार्गावरील वायगावला वळविला. येथील बँकेचे एटीएम कटरने फोडण्यात ते यशस्वी ठरले. त्यातून त्यांनी बावीस लाख रुपयांची रोकड लंपास केली. याचवेळी गस्त घालणाऱ्या पोलीस वाहनाचा आवाज आल्यावर त्यांनी कटर व सिलिंडर जागेवरच सोडून वाहनाने पळ काढला. चोरटे दूरवर पळून जाऊ नये म्हणून सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. ते जवळपासच लपून बसले असतील, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.