लोकसत्ता टीम
वर्धा : एखाद्या प्रकल्पात मुख्य उत्पादनाखेरीज अन्य स्त्रोत निर्माण केल्यास उत्पन्नात भरच पडते, हा व्यवस्थापनाचा साधा निकष म्हटला जातो. रेल्वे फायद्यात आल्यावर तत्कालीन रेलमंत्री लालूप्रसाद यादव यांना विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले होते की, गाईचे अधिकाधिक दोहन केले तर फायदाच फायदा मिळतो. त्याचे प्रत्यंतर मध्य रेल्वेने दाखविले आहे.
हेही वाचा – अमरावती: वादळी पावसाने ५२२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान; ११२ घरांची पडझड
हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्यातील अकरा तालुक्यात पावसाची संमिश्र हजेरी; खामगावात सर्वाधिक
माल वाहतूक व प्रवासी भाडे यावरच विसंबून न राहता विविध स्रोतांद्वारे घसघशीत उत्पन्न घेत मध्य रेल्वे देशात अशा उत्पन्नात इतर रेल्वे विभागास मागे टाकून अव्वल आले आहे. काय आहे या यशाचे गमक, तर विविध स्रोत निर्मिती, सिएसटी, नाशिक, भुसावळ, नागपूर, वर्धा येथील प्रतीक्षालय अत्याधुनिक केले. मुंबई क्षेत्रात सदतीस उपनगरीय ठिकाणी जाहिरात फलक स्थळांची निर्मिती, अमरावती, अकोला, नाशिक रोड, शेगाव, पुणे, नागपूर व भुसावळ या स्थानकावर रेल्वे डब्ब्यात हॉटेल, कोळसा स्वच्छता, आपत्कालीन उपचार केंद्र, प्राप्त वारसा जतन व नूतनीकरण, भायखळा येथे सुपर मार्केट व अन्य स्रोत उत्पन्न देणारे ठरले. हे अधिकचे उत्पन्न अव्वल दर्जा देवून गेले. २०२१-२०२२ ला असे किरायेतर उत्पन्न चाळीस कोटींवर होते. ते आता २०२२-२३ ला सत्त्यांशी कोटींवर गेले आहे. ११६ टक्क्यांनी उत्पन्न वाढले आहे.