वर्धा : शेतमालाचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होवू नये म्हणून अनेक शेतकरी त्यांच्या शेताला तारेचे कुंपण घालून त्यात विजेचा प्रवाह सोडतात. मात्र ही बाब धोकादायक असूनही ते हा प्रकार नाईलाज म्हणून करीत असल्याची गाव पातळीवार चर्चा असते. हीच बाब भोवल्याचे हे प्रकरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – राज्यातील ‘या’ आठ जिल्ह्यांना बसणार अवकाळीचा फटका, हवामान खात्याचा इशारा

हेही वाचा – ओबीसींची ७२ वसतिगृहांऐवजी ५२ वसतिगृहांवर बोळवण; विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी ५ मार्चपासून अर्ज आमंत्रित

किशोर बस्तू उईके हा बालाघाट येथील राहणारा मजूर गिरड येथील राका जिनिंग प्रेसिंग युनिटमध्ये मजुरीला होता. त्याच परिसरात झोपडी उभारून त्याने संसार थाटला होता. या जिनिंगच्या लगतच नरेंद्र मनोहर हलवाई यांचे शेत आहे. नरेंद्र याने त्याच्या शेतातील गव्हाच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतीच्या भोवताल लोखंडी तारा लावून त्यात विद्युत प्रवाह सोडला. मजूर किशोर हा घरी जायला निघाला तेव्हा वीज प्रवाह असलेल्या तारांना त्याचा धक्का लागला. विजेचा जोरदार झटका बसल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. तशी तक्रार मृत किशोरची पत्नी सरस्वती हिने गिरड पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलीस चमुने तपास सूरू केला. तेव्हा कुंपणात विजेचा प्रवाह सोडला असल्याचे तपासात सिद्ध झाले. त्या झटक्यानेच किशोरचा मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने शेतमालक नरेंद्र हलवाई विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा गिरड पोलिसांनी दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha death of laborer due to electric shock crime case against farm owner pmd 64 ssb