वर्धा : गणपती विसर्जनासाठी डोहावर गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज  वर्धेलगतच्या मांडवा गावात घडली. कार्तिक तुळशीराम बलवीर (९), अथर्व सचिन वंजारी (१४) व संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (३५), अशी मृतांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

हेही वाचा : गडचिरोली : वाघाने घेतला आणखी एकाचा बळी; कळमटोला जंगल परिसरातील घटना 

 आज गणेश विसर्जन म्हणून सर्वत्र धुमधडाक्यात मिरवणुका निघाल्या. गावोगावी हीच स्थिती आहे. मांडवा गावातून काही जण विसर्जनासाठी निघाले. कालवा खोलीकरणासाठी झालेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करण्याचे ठरले. अल्पवयीन मुलांनी विसर्जन केले. त्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. त्यांना वाचविण्यासाठी युवा संदीपने पाण्यात उडी घेतली. तिघेही बुडत असल्याचे पाहून सोबत असलेल्या लहान मुलानी गावात धूम ठोकली. गावकरी घटनास्थळी पोहचले. मात्र, तोपर्यंत तिघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला होता. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे. घटनेने मांडवा पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.