वर्धा : सध्या पावसाळा सूरू आहे. कामावर जाणाऱ्या सामान्य नोकरदार व मजूर वर्गास पाऊस चांगलाच अडचणीचा ठरतो. घराबाहेर पडता येत नाही आणि मग रोजगार पण बुडतो. अश्या वेळी मग पावसाळी छत्री आठवते. आजही मोठ्या प्रमाणात छत्र्यांचा उपयोग केल्या जातो. पण त्यासाठी पाचशे रुपये खर्च करणे अनेकांना परवडत नाही. हीच बाब हेरून गावात काम करणाऱ्या आशा सेविकांसाठी झालेला उपक्रम चांगलाच चर्चेत आला आहे.

दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाद्वारे संचालित ग्रामीण रुग्णालय व सिद्दार्थ गुप्ता स्मृती कर्करोग रुग्णालय यांच्यावतीने आशा सन्मान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर व रुग्णालयाचे विशेष अधिकारी डॉ. उदय मेघे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला
army recruitment, Deolali camp, nashik district
सैन्य भरतीसाठी देवळाली कॅम्प येथे एकाच दिवसात १२ हजार तरुण उपस्थित

हेही वाचा – आनंदवार्ता..! देशात आता ‘सीए’च्या वर्षांत तीनवेळा परीक्षा

या कार्यक्रमात बारा आशा संघटिका व चाळीस आशाताईंचा शाल, साडी, प्रशस्तीपत्र व रोख तीन हजार रुपये देवून सन्मान करण्यात आला. यावेळी बोलतांना डॉ. मेघे म्हणाले की आमच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातर्फे आशा सेविकांसाठी माई आरोग्यपत्रिका ही सेवा सुरू करण्यात आली आहे. विविध आरोग्यसेवा या पत्रिकेवर मिळतील. या सेविका केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना गावात पोहोचवीत असतात. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी आशा सेविकांनी पुढाकार घ्यावा व अधिकाधिक माताबहिणींना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन डॉ. मेघे यांनी केले.

डॉ. पराडकर यांनी सावंगीच्या रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या विविध सेवांचे कौतुक केले. अजय पेठे यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी व्यासपीठावर मनिषा मेघे, डॉ. निमा आचार्य, अभिनंदन दास्तेनकर, डॉ. दिप्ती श्रीवास्तव, अविनाश सातोड यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन सुमीत उगेमुगे यांनी केले. कार्यक्रमास उपस्थित ८०० आशा सेविकांना पावसाळी छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आयोजनात नाना शिंगणे, राकेश आगडे, राजेश सव्वालाखे, सुशांत वानखेडे, मोहीत सहारे, सुलोचना मोहोड, स्नेहा हिवरे आदींनी याेगदान दिले.

हेही वाचा – भंडारा : ‘सर आली धावून, रस्ता गेला वाहून…’

छत्री वाटप सुरू झाले तेव्हा या आशा सेविका हरखून गेल्याचे चित्र उमटले. शरद पवार दंत महाविद्यालयच्या संचालक मनिषा मेघे यांनी या सेविका गावात करीत असलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत प्रत्येक आशा भगिनीची स्वतंत्र भेट घेतली. आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांनी आशा सेविकांना मिळालेला हा सन्मान अद्भुत असल्याचे मत शेवटी व्यक्त केले.