वर्धा : एखाद्या मागास गावात सर्व सोयी आल्यास गावकऱ्यांना किती आनंद होणार, ते सांगायला नको. केंद्रीय सामाजिक मंत्रालयाने अशीच एक योजना आणली आहे. पंतप्रधान अनुसूचित जाती अभ्युदय योजना ही केंद्रपुरस्कृत योजना अनुसूचित जाती बहुल गावासाठीच आहे. यात देशातील २९ हजार ९१६ गावांची निवड करण्यात आल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली. यात १८ हजार ४२४ गावे पन्नास टक्के अनुसूचितजातींच्या लोकसंख्येची तर ४० टक्के लोकसंख्येची ११ हजार ४९२ गावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : नागपूर : जवाहर बाल मंचच्या माध्यमातून मुलांमध्ये काँग्रेस…

त्यापैकी ४ हजार ९१५ गावे आदर्श म्हणून घोषित करण्यात आली आहे. या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रती गाव वीस लाख रुपये मंजूर झाले आहे. त्यातून पेयजल, शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, सामाजिक सुरक्षा अन्य कामे होतील. वर्धा लोकसभा क्षेत्रात सात गावांची निवड झाली असून वर्धा जिल्ह्यातील बहादरपुर, कवठा व दूरगुडा ही तीन गावे त्यात आहे. या योजनेत वर्धा क्षेत्रातील अधिकाधिक गावांचा समावेश करण्याचा प्रयत्न असल्याचे खासदार तडस म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha district 7 villages are added in abhyudaya yojana mp ramdas tadas informed pmd 64 css