वर्धा : विधानसभेत १०० टक्के यश मिळवून देण्याचा जिल्हा भाजपचा निर्धार अखेर यशस्वी झाला आहे. देवळीत इतिहास घडला. पाच वेळा सलग विजयी होणारे काँग्रेसचे रणजित कांबळे यांना प्रथमच पराभव चाखावा लागला. भाजपचे राजेश बकाने यांनी दमदार बढत घेत त्यांना धूळ चारली आहे.
कांबळे यांची डबल हॅटट्रिक हुकविणाऱ्या बकाने यांनी कमळ फुलवून देवळीत इतिहास रचला. या मतदारसंघात प्रथमच भाजपने पाय रोवले आहे. आर्वीत तर भाजप नव्हे, कमळ नव्हे तर ओन्ली सुमित हा परवालीचा शब्द ठरला होता. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात दादाराव केचे यांनी विरोधात काम केल्याची राळ उडाली, पण त्याने फरक पडला नसल्याचे आज निकालातून स्पष्ट झाले. आर्वीत काँग्रेसच्या मयुरा काळे यांच्यावर वानखेडे यांनी २५ हजारपेक्षा अधिक मतांनी मजल मारली.
हेही वाचा – शिवसेनेसोबत बंडखोरी केलेल्या जागेवर काँग्रेस पिछाडीवर, सांगली पॅटर्न अपयशी
हिंगणघाट येथे भाजपचे समीर कुणावार यांनी २७ हजारपेक्षा अधिक मते अतुल वांदिले विरोधात मिळवून हॅटट्रिक साधली. या मतदारसंघात आमदारकीची हॅटट्रिक मारणारे ते पहिले विजयी वीर ठरले आहे. त्यांच्या विरोधात असलेले शरद पवार राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांना लढत देताना दमछाक झाल्याचे मत मोजणीतून दिसून येते. वर्ध्यात भाजपची सुरवातीस धाकधूक उडाली होती. कारण काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे यांनी पहिल्या दहा फेरीत आघाडी ठेवली होती. मात्र शहरी पट्टा सुरू झाला आणि भोयर यांनी मग मागे वळून पाहिलेच नाही. गत दोन विधानसभा निवडणुकीत जे मताधिक्य मिळाले होते तेवढेच आता मिळवून त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.
जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे म्हणतात की चारही जागा जिंकण्याचे स्वप्न भाजपने पूर्ण केले आहे. शहर व ग्रामीण अश्या दोन्ही भागांत मतदार आमच्या पाठिशी राहिले. देवळीत आम्ही इतिहास रचला आहे. त्यासाठी अथक प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा मित्रपक्षांकडून आग्रह करीत खेचली होती. त्यांचा विश्वास आम्ही सार्थ ठरविला आहे. सुमित वानखेडे व राजेश बकाने हे प्रथमच आमदार झाले आहेत. तर भोयर व कुणावार यांनी तिसऱ्यांदा विजय प्राप्त केला. भाजपचे तेली समाज उमेदवार समीकरण यशस्वी तर आघाडीचे दोन याच समाजातील उमेदवार देण्याचे डाव फसले आहे. आर्वी व वर्धा येथील विजय हा पक्षासोबत उमेदवाराचे व्यक्तिगत व्यक्तिमत्व याचा समजल्या जात आहे.