लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा म्हणून करून दिल्या जाते. कारण गांधीजी यांचे वास्तव्य. मात्र, वर्धा जिल्हा स्वदेशीचे तीर्थक्षेत्र असल्याचा साक्षात्कार स्वदेशी जागरण मंचला झाला आहे. येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यानात मंचचे अखिल भारतीय संघटन मंत्री कश्मिर लाल यांची हजेरी लागली होती.

तेव्हा ते म्हणाले की वर्धा ही महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, दत्तोपंत ठेंगडी, जमनालाल बजाज व राजीव दीक्षित या पाच कर्मयोग्यांची पवित्र भूमी आहे. ही व्यक्तिमत्वे स्वदेशीचा पुरस्कार करणारी होती. त्यामुळे येणाऱ्या काळात वर्धा स्वदेशीचे तीर्थक्षेत्र होणार. ते निर्माण करण्याचा संकल्प आपण आज सोडूया. मोठ्या कारखान्यांची निर्मिती करून त्यात स्वदेशी वस्तू टाटा सारख्या कारखानदारांनी तयार केल्या. त्यामागे प्रेरणा स्वामी विवेकानंद यांची होती. ही माहिती फार कमी लोकांना आहे. स्वदेशी परीक्षण आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्यामागे स्वामी विवेकानंद यांची प्रेरणा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा-गडचिरोली : नक्षलग्रस्त गर्देवाडात २४ तासांत उभारले पोलीस मदत केंद्र

भारतीय धर्म हा जगातील एकमेव विज्ञाननिष्ठ धर्म होय.धर्माच्या प्रत्येक कर्मामागे विज्ञानाचा आधार आहे.भारतीय धर्माने निसर्ग, सजीव प्राणी तसेच निर्जीव घटकांचा विचार केला.त्याची सांगड मानवी जीवनाशी घातली. त्यातून कर्म, भक्ती, ज्ञान,ध्यान योग साकारला. भारतातील अध्यात्म केवळ मुक्ती व स्वर्गाचा विचार करीत नाही. तर अध्यात्म व विज्ञान यांची सांगड घालते. त्याद्वारे विश्वातील मानव सुखी कसा होईल याचे चिंतन करणारे स्वामी विवेकानंद हे पहिले पुरुष होय, असे विचार लाल यांनी मांडले.

आणखी वाचा-परिवहन खात्याचा ‘रस्ता सुरक्षा अभियान’बाबत गोंधळ!

याप्रसंगी मंचचे प्रांत संयोजक शिरीष तारे, माजी नगराध्यक्ष अतुल तराळे, सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष श्याम देशपांडे, रा. स्व.संघाचे जिल्हा कार्यवाह मुकुंद पिंपळगांवकर, मंचचे जिल्हा संयोजक शशांक नानोटी, प्रसाद जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. स्वदेशी मंचचे संजय बडगीलवर, अतुल देशपांडे, बाळू पुरोहित, अनिल तिवारी, अनिल कावळे, अरविंद कोकाटे, प्रमोद रंगारी यांनी कार्यक्रम आयोजनात योगदान दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wardha district swadeshi pilgrimage site in upcoming times pmd 64 mrj
Show comments