वर्धा : सावंगीच्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ललित वाघमारे यांची तर प्र-कुलगुरूपदी डॉ. गौरव वेदप्रकाश मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. मिश्रा कुटुंबात चार सर्वोच्च पदे येण्याचा विक्रम यानिमित्ताने घडला आहे.
अभिमत विद्यापीठाच्या जडणघडणीपासून जुळलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचा एकूण निर्णयावर प्रभाव दिसून येत आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ललित वाघमारे यांची निवड कुलपती दत्ता मेघे व विश्वस्त सागर मेघे यांच्या सल्ल्याने वैद्यकीय परिषदेच्या सदस्यांनी केली. व्यवस्थापन, प्रशासन व रुग्णालय व्यवस्थापन यांच्यातील ते एक उत्तम दुवा समजल्या जातात. प्र-कुलगुरू म्हणून याच विद्यापीठाचे प्र-कुलपती असलेले डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांचे चिरंजीव डॉ. गौरव यांची निवड करण्यात आली. डॉ. वेदप्रकाश मिश्रा हे कराड येथील कृष्णा वैद्यकीय संस्थेचे कुलपती असून त्यांच्या सुविद्य पत्नी त्या विद्यापीठात प्र-कुलगुरू आहेत तर स्नुषा सावंगी येथील दंत महाविद्यालयात उच्चपदावर कार्यरत आहेत. आज मावळते कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी आपल्या पदाची सूत्रे डॉ. वाघमारे यांना सुपूर्द केली.