वर्धा : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार वृष्टीने जिल्हा जलमय झाला असून ग्रामीण भाग त्रस्त झाल्याचे चित्र आहे. त्यातच नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले. लहान पुलावरून पाणी वाहू लागले असल्याने वाहतूक न करण्याचा इशारा प्रशासनाने दिला. मात्र काही बहाद्दर त्यास जुमानत नाहीच. आणि मग आपत्ती ओढवते. इथे तसेच झाले.

जाम येथे जाण्यासाठी टाटा आयशर ही गाडी माल घेऊन निघाली होती. वाटेत वाघाडी नदीवर पूल असून त्यावरून पाणी वाहू लागले होते. मात्र चालकाने त्याची तमा नं बाळगता गाडी पाण्यात टाकली. पाण्याचा वेग अनावर असल्याने ही गाडी सरकत सरकत नदीत पडली. चालकासह विलास शहाणे व हिरालाल गुज्जर हे कसेबसे गाडीतून निघत झाडाला लटकले. बराच वेळ ते झाडाला लटकून होते. ही घटना पाहणाऱ्यांनी लगेच प्रशासनास कळविले. बचाव चमू लगेच घटनास्थळी पोहोचली. त्यांनी पाण्यात उडी मारून तिघांनाही वाचविले. तहसीलदार कपिल हटकर यांनी मोठ्या प्रयत्नांनी तिघांचे प्राण वाचल्याचे नमूद केले. चालकास पाण्यात गाडी नं टाकण्याची विनंती इतर दोघांनी केली होती. पण न ऐकल्याने जिवावर बेतता बेतता राहले, अशी भावना सुखरूप असलेल्या विलास शहाणे याने व्यक्त केली.

leopard got stuck in a cage set up by the forest department in Girda village Buldhana | गिरडा शिवारात पुन्हा 'ट्रॅप'!सहावा बिबट अडकला पिंजऱ्यात; 'ती' अडकली, 'तो' रेंगाळला... ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
गिरडा शिवारात पुन्हा ‘ट्रॅप’!सहावा बिबट अडकला पिंजऱ्यात; ‘ती’ अडकली, ‘तो’ रेंगाळला…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी
heavy rain Gondia district,
गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीचे चार बळी, ६९ जणांना वाचवले
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
Jalgaon lightening marathi news
जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून पाच जण जखमी, कांग नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू
Noel Tekkekara of Navi Mumbai died by drowned in Devsu
नवी मुंबईतील नोएल तेक्केकारा यांचा देवसूमध्ये बुडून मृत्यू
What is the price of gold on Shri Krishna Janmashtami
श्रीकृष्ण जन्माष्टमीला सोन्याचे दर बघून ग्राहक चिंतेत.. झाले असे की…

हेही वाचा – श्याम मानव यांनी राजकीय भाष्य केले असेल तर गैर काय – बच्चू कडू

सतत वृष्टी सूरू असल्याने ग्रामीण रस्ते उखडले आहे तर काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत आहे. आज विखनी नाल्याला पूर आल्याने हा मार्ग बंद पडला आहे. तर सेलू तालुक्यातील पहिलाणपूर ते दहेगाव गोसावी हा मार्ग पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प पडली. गाडी वाहून जाण्याची घटना घडलेल्या भागात चांगलीच वृष्टी सूरू आहे. समुद्रपूर तालुक्यातील जाम, गिरड, वयगाव, कांधली, माणगाव, या महसूल मंडळात सरासरी ८० ते ८८ मिमी पावसाची नोंद झाली. एकूण ५२७ मिमीची पर्जन्य नोंद झाली.

हेही वाचा – “महविकास आघाडीत ११ ‘इ-मुख्यमंत्री’; नशीब त्यांनी व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड…” मुनगंटीवार यांची टीका

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सदर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर परत सतर्क राहून घराबाहेर नं पडण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील पांजरा बोथरा, उमरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, रोठा, कुऱ्हा, शिरुड व अन्य लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर हे तालुके सततच्या पावसाने धुवून निघाले आहे. तर मोठे व माध्यम धरणे पूर्ण भरण्याची वाटचाल करीत आहे. पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे.