वर्धा : उन्हाळ्यात मे महिन्याचा उत्तरार्ध हा गृहिनीसाठी जरा लगबगीचाच असतो. वर्षभरातील वाळवन याच काळात तयार केल्या जात असते. लोणचे, धापोडे, कुरड्या, मुगवड्या, शेवया आदी जिन्नस तयार करुन ठेवण्याची घरोघरी लगबग. मात्र आता हे चित्र शहरी भागात कमी तर ग्रामीण भागातच अधिक पाहायला मिळते. पण प्रामुख्याने लोणची तयार करण्याची हौस सर्वत्र दिसून येते. बाजारात कैरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचे चित्र आहे. यावर्षी चांगली आवक असल्याचे ठोक भाजी विक्रेते सांगतात.

दोन पिढ्यांपूर्वी प्रामुख्याने विदर्भातील पिढीजात गावरान आंबा लोणची तयार करण्यासाठी पुरेसा उपलब्ध असायचा. मात्र आता तो दिसेनासा झालं आहे. कारण आमराई नष्ट झाली. अचलपूर, चांदूर बाजार येथून मोठ्या प्रमाणात आवक व्हायची. इतर जिल्ह्यांतून पण काही प्रमाणात गावरान आंबा येत असे. आता केवळ उमरखेड भागातून आंबा येत असल्याचे सुप्रसिद्ध केळकर लोणचे निर्माते अतुल केळकर सांगतात. दोन पिढ्यांपासून हे कुटुंब तयार लोणचे बाजारात व्यवसाय करीत आहे. गावरान आंबा हाच लोणचे करण्यासाठी उत्तम. आंबट गोड चवीचा व भरपूर गर तसेच मध्यम जाड साल असलेला हा आंबा बाहेरून आणावा लागतो.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
29 villages, Vasai, Vasai latest news, Vasai marathi news,
वसई : २९ गावांचे प्रकरण तापले, सुनावणीची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Satavahana settlement remains were found at Tekabhatti four kilometers from Chivandagaon Gondpipari taluka
चंद्रपूर जिल्ह्यात सातवाहनकालीन वस्तीचे अवशेष; कधी होते मोठे शहर, आज आहे गर्द वनराई…
Cyclone Feingal cleared entire state and once again state is heading towards winter
विदर्भ गारठला… गोंदिया ९.४, तर नागपूर, वर्धा १० अंश सेल्सिअस

हेही वाचा – जाहिरातीचा तपशील बघायचा असल्यास शुल्क द्या, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय म्हणते…

मध्यप्रदेशातील बैतुल व छिन्दवाडा या दोनच जिल्ह्यातून हा आंबा नागपूरच्या फुले मार्केटमध्ये येतो. उर्वरित मग दक्षिणेतील कलमी आंबाच असतो, असे केळकर सांगतात.

लोणची तयार करण्यासाठी हा गावरान आंबाच उपयुक्त म्हटल्या जातो. कारण लोणची मुरल्यावर फोड व साल एकजीव असते. साल वेगळी पडत नाही. म्हणून लोणची उत्पादक कंपन्या विदर्भात हे आंबे खरेदी करण्यास येतात. दिल्लीचे पण आंबा व्यापारी इथेच येत असल्याचे सांगितल्या जाते.

हेही वाचा – क्रिकेट सट्ट्यावर गुन्हे शाखेची धाड….चेन्नई सुपर किंग्स आणि….

यावर्षी आवक चांगली असल्याने २२ ते २५ रुपये किलो असा ठोकचा भाव आहे. बहुतेक व्यापारी तसेच लोणचे उत्पादक यांची खरेदी आटोपली असल्याचे चित्र आहे. गतवर्षी हा भाव ३० रुपये किलोपर्यंत चढला होता. आता उपलब्ध आंब्यावर ग्राहकांची झुंबड उडत असल्याचे दिसून येते.

Story img Loader