वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या इतिहासात आज नवाच पायंडा पाडला. न्याय मागण्यासाठी विद्यार्थी विद्यापीठ प्रशासनाकडे गेले नसून थेट जिल्हाधिकारी यांना साकडे घातले आहे. विद्यापीठातील संविधानाच्या प्रतिमेसमोर ठिय्या देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
कुलगुरू रजनीश शुक्ल यांच्या विरोधात बहुतांश विद्यार्थी एकवटले आहे. जनसंवाद विभागप्रमुख धर्मेश कथरिया यांचे निलंबन रद्द करावे. कुलगुरू शुक्ल यांनी महिलेस नोकरीचे आश्वासन देत केलेले अनैतिक संभाषण व्हायरल झाले. त्याची चौकशी करावी. संशोधक विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करावे. विद्यापीठात महिलांना भयमुक्त वातावरणात काम करता यावे. गत चार वर्षांत झालेल्या सर्व नियुक्त्या तपासून चौकशी व्हावी अश्या व अन्य मागण्या आहेत.
हेही वाचा – रेल्वेने प्रवासाला निघालात? थांबा, आधी ‘हे’ वाचा, १४ आणि १५ ऑगस्टला तब्बल ३३ गाड्या…
हेही वाचा – नागपूर : मेट्रो स्थानकावरील रात्रीच्या खेळाचे गुढ कायम, अज्ञाताचा तासभर धुमाकूळ?
आंदोलनात काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनावर राहील, असेही विद्यार्थी खबरदार करतात. एकंदरीत स्थिती विद्यापीठाचे भविष्य प्रश्नांकित करणारी ठरली असून जिल्हा प्रशासन आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.