वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठ्या सभा वातावरण ढवळून काढणाऱ्या ठरतात. कारण सभेसाठी स्टार प्रचारक येतात. चित्रपट तारे असतील तर पाहायलाच नको. सभेची गर्दी माहोल निर्माण करून जाते. काही दिवस त्याची चर्चा पण रंगते. तसेच आता भाजपचे झाले. या पक्षाचे सर्वात मोठे स्टार प्रचारक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत. त्यांची सभा आपल्या मतदारसंघात व्हावी म्हणून या पक्षाचाच नव्हे तर मित्रपक्षाचा उमेदवार पण अपेक्षा ठेवून असतो. लाखोची सभा झाली की काम फत्ते, अशा भावनेत नेते असतात. मात्र, आता भाजप उमेदवारास सभा मिळणार नाही. कारण मोदी यांची झालेली सभा. यानंतर मोठ्या सभेची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

त्याचे झाले असे की, पंतप्रधान मोदी यांची सभा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा व अमरावती जिल्ह्यातील आमदार व खासदारांची खास बैठक नागपूर-अमरावती महामार्गवरील एका पॉश हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री घेतली. त्यात विविध मुद्यांवर चर्चा झाली. वर्धा व अमरावती मतदारसंघात अनुकूलता वाढत असल्याचे काही नेत्यांनी सांगितले. आणखी काय व्यूव्हरचना करावी काय, अशी विचारणा झाली. मात्र, मोदी यांची सभा झाल्याने आता मोठी सभा मिळणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले. आता सभेपेक्षा गावपातळीवार लक्ष केंद्रित करा. बूथ आणखी मजबूत करून दक्ष रहा. झालेले नियोजन अंमलात आणा, अशा सूचना देण्यात आल्याचे समजते.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Siddharth Statement on crowd of 'Pushpa 2'
‘पुष्पा २’च्या ट्रेलर लाँचवेळी पाटण्यात जमलेल्या गर्दीवर सिद्धार्थचं वक्तव्य; म्हणाला, “जेसीबीचं काम सुरू असताना…”
Peoples representatives do not want helmets then why police insisting Jan Manch organization Question
लोकप्रतिनिधींना हेल्मेट नको, मग पोलिसांचाच आग्रह का? जनमंचचे राजीव जगताप म्हणतात, ‘पायी चालणाऱ्यांनाही…’
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग

हेही वाचा – ‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

हेही वाचा – पीएसआय संजय सोनवणे म्हणतात, “मी पोलीस आयुक्तांना ओळखत नाही,” नेमका काय आहे प्रकार? जाणून घ्या…

मोदींच्या सभेनंतर वेगळा काही इव्हेंट करण्याची गरज उरली नसल्याचे ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे पडले. कारण खुद्द मोदी यांनी आपल्या भाषणातून ही सभा अभूतपूर्व झाल्याचे सांगितले आहे. वर्धेतील यापूर्वीच्या दोन सभांपेक्षा ही सभा अधिक मोठी झाल्याचे सांगत मोदी यांनी लोकांचे प्रेम वाढत असल्याची ही पावती असल्याचे सांगितले. त्यामुळे मोठी सभा राहणार नसल्याची बाब खासदार, आमदारांना सुखावून गेली. तरी नितीन गडकरी, अजित पवार यांच्या गावपातळीवार सभा होवू शकतात, असे एका पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Story img Loader