वर्धा : अमर काळे खासदार झालेत. पण त्यांनी घोषित केलेला एक लाख मताधिक्याचा आकडा मात्र ते पार करू शकले नाही. कारण मोर्शी विधान सभा क्षेत्र होय. या ठिकाणी तडस यांना १५ हजार पेक्षा अधिक मतांची लीड मिळाली. याची वेगवेगळी कारणे दिल्या जात आहे. खरं तर या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार म्हणून रामदास तडस यांच्या विरोधात सर्वाधिक रोष व्यक्त झाला तो मोर्शीतून. पक्षाचे तसेच त्यांच्या तैलिक समाज संघटनेचे पदाधिकारी उघड विरोधात उतरले होते. आम्हाला ते दिसलेच नाही, अशी जाहीर शेरेबाजी झाली. आमचे रेल्वे मार्ग ठप्प आहे, अश्या तक्रारी गाजल्या. पण याच क्षेत्रात तडस बाजी मारून गेले. त्यांना १५ हजारावर मतांचा लीड मिळाला. तर या एकट्या विधानसभा क्षेत्रात काळे माघारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन देशमुख म्हणाले की काळे ईथे मागे पडण्यामागे अनेक कारणे आहेत. राष्ट्रवादी मागे पडली. मित्र नाही. फोनवर सगळे सांगता येत नाही. तर या भागातील प्रतिष्ठित नागरिक भैय्यासाहेब खेडकर म्हणाले की स्थानिक आमदार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार यांच्या माध्यमातून मोठा विकास निधी आणला. तसेच खासदार अनिल बोन्डे यांचा प्रभाव आहेच. त्यामुळे तडस यांच्या नाराजी पेक्षा भुयार व बोन्डे यांचा प्रभाव भाजपच्या कामात आला, असे म्हणता येईल.

हेही वाचा : बळवंत वानखडे यांना अमरावतीकरांनी दिलेली साथ ठरली निर्णायक

या भागात मोर्शी व वरुड हे शहरी व सधन पट्टे म्हणून ओळखल्या जातात. याच भागात तडस यांनी चांगली मते घेतली. तर अमर काळे या भागासाठी नवखा चेहरा होते. त्यांना मदत करणारे मित्रपक्ष हे पारंपरिक कट्टर राजकीय वैरी आहेत. पुढाकार घेऊन काम करणारे कोणी नव्हते. त्यामुळे काळे यांच्या तुतारीचा आवाज पिचला. खुद्द अमर काळे यांनी प्रचाराची भिस्त पूर्णपणे स्थानिक नेत्यांवर ठेवल्याने त्यांना धुसफूस कळली नाही. मात्र या एकाच मतदारसंघाने युतीची लाज राखली, असे आता बोलल्या जात आहे.